बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी PM Cares फंडमध्ये मदत केली. मात्र सलमाननं असं काहीही न करता थेट तळागाळातील लोकांना मदत केली आहे. त्यामुळे त्याच्या या कृतीचं कौतुक होत आहे.
मुंबई, 05 जून : सुपरस्टार सलमान खानचा भारत आज सर्व सिनेमागृहात रिलीज झाला. या सिनेमात अभिनेता जॅकी श्रॉफ सलमानच्या वडीलांची भूमिका साकारत आहेत. पण रिअल लाइफमध्येही सलमान आणि जॅकी श्रॉफ यांचं नातं मुलगा आणि वडीलांसारखंच आहे. खऱ्या आयुष्यातही जॅकी सलमानला आपला मुलगा मानतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांनी सलमान त्यांच्यासाठी किती खास आहे याचा खुलासा केला. जॅकी श्रॉफ म्हणाले, ‘सलमान माझ्यासाठी खूप खास आहे. तो मला माझ्या मुलासारखा आहे. त्यामुळे ते नेहमीच प्रोड्यूसरकडे सलमानसाठी काम मागत असत. 1988 मध्ये आलेल्या ‘फलक’ सिनेमाच्या वेळी मी सलमानचे काही फोटो काढले होते आणि अजूनही मी त्याचे हे फोटो माझ्या खिशात घेऊन फिरतो. ते पुढे म्हणाले, मी सलमानचे हे फोटो निर्मात्यांना दाखवत असे आणि त्यांना सलमानला कास्ट करण्यासाठी सांगत असे. मी सलमानसाठी अनेक निर्मात्यांशी बोललो होतो कारण, मला माहित होतं हा मुलगा एक दिवस सुपरस्टार होईल.’ ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीने हवाई दलाच्या बेपत्ता विमानावरून मोदींची उडवली थट्टा
जॅकी श्रॉफ सांगतात, ‘एकेकाळी सलमान माझा खूप मोठा फॅन होता. त्याला माझ्या जीन्स आणि शूज खूप आवडत असत.’ भारत सिनेमातील जॅकी यांची भूमिका फार मोठी नसली तरीही ते सलमानचे ऑनस्क्रीन बाबा म्हणून खूश आहेत. ‘भारत’ सिनेमामध्ये जॅकी श्रॉफ पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. लग्नाच्या प्रश्नावर सलमान खान म्हणतो, या संकल्पनेवर माझा विश्वास…
समीक्षकांच्या मते, सलमान खानचा ‘भारत’ या वर्षातील सर्वात मोठा सिनेमा ठरू शकतो. प्रेक्षकांकडून या सिनेमाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमामध्ये सलमान खान व्यतिरिक्त कतरिना कैफ, दिशा पाटनी, सुनील ग्रोवर, तब्बू, जॅकी श्रॉफ अशी तगडी स्टार कास्ट आहे. Bharat Public Review- अॅक्शन नाही तर रडवतो सलमानचा ‘भारत’