JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मी काही गमावलं नाही तर मिळवलं...' इरफानच्या निधनानंतर पत्नीची इमोशनल पोस्ट व्हायरल

'मी काही गमावलं नाही तर मिळवलं...' इरफानच्या निधनानंतर पत्नीची इमोशनल पोस्ट व्हायरल

‘जर संधी मिळाली तर पत्नी सुतापासाठी मला पुन्हा एकदा जगायचं आहे’ असं एका मुलाखतीत इरफाननं म्हटलं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 मे : बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता इरफान खाननं 29 एप्रिलला जगाचा निरोप घेतला. आईच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांतच इरफाननं वयाच्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्यानं देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मागच्या दोन वर्षांपासून इरफान न्यूरोइंडोक्राइन या कॅन्सरशी लढत होता. मागच्याच वर्षी यावर उपचार घेऊन तो भारतात परतला आणि अंग्रेजी मीडियम या सिनेमाचं शूटिंग सुद्धा पूर्ण केलं. पण यानंतर त्याची तब्बेत पुन्हा बिघडली आणि 29 एप्रिलला इरफानचं निधन झालं. इरफानच्या निधनानंतर त्याची पत्नी सुतापा सिकदार यांची एक फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. पतीच्या निधनानंतप सुतापा यांनी पहिल्यांदाच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट करुन दिली. त्यांनी लिहिलं, ‘मी काही गमावलं नाही तर सर्वकाही मिळवलं आहे…’ एका ओळीच्या या पोस्टमधून त्या बरंच काही सांगून जातात. या एका ओळीतच त्यांचा खंबीरपणा लक्षात येतो. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांचं सांत्वन केलं आहे. दीपिकाची ही इच्छा कधीच नाही होणार पूर्ण; ऋषी कपूरही या ‘Intern’ची पाहात होते वाट

इरफानच्या अखेरच्या काळात सुतापा दिवसातले 24 तास त्याच्या सोबत होत्या. जेव्हा मागच्या वर्षी इरफान भारतात परतला होता त्यावेळी एका मुलाखतीत त्यानं सांगितलं होतं, काहीतरी मिळवायच्या नादात आपण अनेक गोष्टींपासून दूर जातो. या आजरपणानं मला माझ्या कुटुंबाच्या जवळ आणलं. सुतापा प्रत्येक क्षण माझ्या सोबत होती. जर संधी मिळाली तर तिच्यासाठी मला पुन्हा एकदा जगायचं आहे. सुतापा ही इरफानची मैत्रिण होती आणि त्याच्या कॉलेजपासून संघर्षांच्या काळ ते त्याचं आजारपण प्रत्येक वेळी त्या त्याच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या. …आणि स्वत:च्याच लग्नात बेशुद्ध पडले ऋषी कपूर, नीतू यांनी सांगितला होता किस्सा आजारपणामुळे तो बॉलिवूडपासून दूर होता. मात्र प्रकृती सुधारल्यावर त्यानं ‘अंग्रेजी मीडियम’ या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. याआधी रिलीज झालेल्या त्याच्या ‘हिंदी मीडियम’ सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. मात्र आजारपणातचं शूटिंग पूर्ण केल्यानंतर त्याच्या प्रमोशनलाही उपस्थित राहू न शकलेल्या इरफानचा हा शेवटचा सिनेमा ठरला. (संपादन- मेघा जेठे. ) इरफान खाननं ऋषी कपूर यांच्याबद्दल सांगितली होती ही खास गोष्टी, वाचून व्हाल भावुक

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या