JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / फक्त 6 वर्षांचा होता अभिनेता, आयरन मॅन फेम Robert Downey Jr ला वडील द्यायचे ड्रग्ज

फक्त 6 वर्षांचा होता अभिनेता, आयरन मॅन फेम Robert Downey Jr ला वडील द्यायचे ड्रग्ज

आज इतकं यश मिळवणारा रॉबर्ट डाउनी ज्युनिअर एकेकाळी ड्रॅग्जच्या विळख्यातही अडकला होता. या व्यसनामुळे अनेक दिवस त्याला रिहबमध्ये जावं लागलं होतं.

जाहिरात

Iron Man fame Robert Downey Jr

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,  04 एप्रिल: मार्वल स्टुडिओजची सुपरहिट सिनेमात टोनी स्टार्क म्हणजेच आयरनमॅनच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनिअर आज त्याचा 58वा वाढदिवस साजरा करत आहे. रॉबर्ट डाउनी ज्युनिअर हे हॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. आपल्या नावापेक्षा आपल्या भूमिकांच्या नावानं रॉबर्ट डाउनी ज्युनिअर सर्वाधिक ओळखला गेला. आज त्याच्या अनेक भूमिका लहान मुलांच्या फार जवळच्या आहेत. आयरनमॅनला तर सगळीच लहान मुलं ओळखतात. रॉबर्ट डाउनी ज्युनिअरच्या बर्थ निमित्त आज त्याच्याबद्दल अशी एक गोष्ट जाणून घेऊया ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील. रॉबर्ट डाउनी ज्युनिअरचा जन्म 4 एप्रिल 1965मध्ये मॅनहॅटन, न्यूयॉर्कमध्ये झाला. रॉबर्टला घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालं. त्याचे वडील रॉबर्ट डाउनी हे हॉलिवूड इंडस्ट्रीतील ज्येष्ठ कलावंत आहेत. त्याची आई Elsie Ann Ford देखील प्रसिद्ध अभिनेत्री होती. वडील प्रसिद्ध निर्माते होते. मोठ्या पडद्यावर प्रत्येक संकटांशी दोन हात करणाऱ्या आयरन मॅनचं वैयक्तिक आयुष्य मात्र अनेक संकटांनी भरलेलं होतं. हेही वाचा - ‘वडिलांची मदत असती तर आज मी इंडस्ट्रीत…’; कुमार सानूंविषयी मुलाचं मोठं वक्तव्य रॉबर्ट डाउनी ज्युनिअर केवळ 5 वर्षांचा असताना त्याला बालकलाकार म्हणून पहिला सिनेमा मिळाला. 1970मध्ये रिलीज झालेल्या पाउंड सिनेमात रॉबर्ट डाउनी ज्युनिअरनं पपी ही भूमिका साकारली होती.  त्याचप्रमाणे रॉबर्ट डाउनी ज्युनिअर हा ट्रेंड मार्शल आर्टिस्ट देखील आहे. चायनीज मार्शल आर्ट्स Wing Chun Kung Fuमध्ये त्यानं ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. वयाच्या केवळ 20व्या वर्षी त्यानं हे शिक्षण घेतलं होतं. तो आजही मार्शल आर्टची प्रॅक्टिक्स करत असतो.

रॉबर्ट डाउनी ज्युनिअर हा केवळ उत्तम अभिनेता नाही तर एक टॅलेंडेट म्युझिशियन देखील आहे. हिटार, पियानो आणि ड्रॅम्प वाजवण्यात अभिनेता पारंगत आहे. त्यानं The Futurist हा त्याचा अल्बम देखील लाँच केला होता. आज इतकं यश मिळवणारा रॉबर्ट डाउनी ज्युनिअर एकेकाळी ड्रॅग्जच्या विळख्यातही अडकला होता. या व्यसनामुळे अनेक दिवस त्याला रिहबमध्ये जावं लागलं होतं. याचं कारण दुसरं तिसरं कोणी नाही तर त्याचे वडील होते. रॉबर्टनं त्याच्या Si या डॉक्युमेंट्रीमध्ये वडिलांच्या वाईट संगोपनाविषयी सांगितलं आहे. त्यात काही अशा क्लिप्स देखील आहेत ज्यात ते आपली चूक मान्य देखील करताना दिसत आहे. त्यांनी रॉबर्टला वयाच्या 6व्या वर्षी ड्रग्ज देण्यास सुरूवात केली होती. इतक्या लहान वयात ड्रग्ज मिळाल्यामुळे याची रॉबर्टला सवय झाली. त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांची पहिली पत्नी देबोराह फॉकनर यांनी त्यांना घटस्फोट दिला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या