मुंबई, 21 जून : आंतराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं बॉलिवूड कलाकारामध्येही सक्रियता पहायला मिळाली. शिल्पा शेट्टी ते बिपाशा बासु, अनुपम खेर आणि ट्विंकल खन्ना पर्यंत सर्वांनीच योग दिनानिमित्त त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. यात अभिनेता अक्षय कुमारही मागे नाही. जीवनात फिटनेसला सर्वाधिक महत्त्व देणाऱ्या अक्षय कुमारनं ट्विटरवर एक फोटो शेअर केला जो सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. योग करण्याचा मोह इनायाला आवरेना, पाहा सोहा अली खानच्या लेकीचे फोटो अक्षयनं योग दिनाला स्वतःचा फोटो शेअर करण्याऐवजी एका दुसऱ्याचं व्यक्तीचा फोटो शेअर केला ज्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. अक्षयनं शेअर केलेला हा फोटो त्याच्या आईचा आहे. हा फोटो शेअर करताना अक्षयनं लिहिलं, ‘काही असं शेअर करत आहे. ज्यावर मला खूप अभिमान आहे. वयाच्या 75 व्या वर्षी गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं असताना माझ्या आईनं योगासनं करणं सुरू केलं आहे आणि आता हा तिच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. यात ती प्रत्येक दिवशी प्रगती करत आहे.’ Bigg Boss Marathi च्या घरातून अभिजीत बिचुकलेला अटक
फिटनेस फ्रिक असलेल्या अक्षयला त्याची आई अरुणा भाटिया यांचा किती अभिमान वाटतो हे त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरून दिसून येतं. अक्षयाच्या या पोस्टची विशेषतः त्याच्या आईची सोशल मीडियावर सगळीकडे मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. अक्षयच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. याशिवाय हा फोटो अनेकांनी शेअर केला आहे. Kangana Ranaut ने आपल्या योग गुरूला गुरुदक्षिणा म्हणून दिला फ्लॅट
अक्षय कुमारचे ‘मिशन मंगल’ आणि ‘गुड न्यूज’ हे दोन सिनेमे लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याशिवाय तो रोहित शेट्टी सोबत सूर्यवंशी, हाऊसफुल 4 आणि लक्ष्मी बॉम्बे हे सिनेमा करत आहे. अक्षय त्याच्या आयुष्यात फिटनेसला खूप महत्त्व देतो. याशिवाय तो त्याच्या मुलांनाही व्यायामाचं महत्त्व समजावताना दिसतो. अनेकदा तो मुलगी निताराचे फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. बॉलिवूड अभिनेत्रींचं फिटनेस सिक्रेट, परफेक्ट फिगरसाठी करतात या खास गोष्टी ============================================================ VIDEO: योग फिव्हर! डॉग स्क्वॉडने केलेल्या ह्या कवायती तुम्ही पाहिल्या का?