JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिजीत सावंतला गाण्याची संधी का मिळाली नाही? हे आहे बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव

अभिजीत सावंतला गाण्याची संधी का मिळाली नाही? हे आहे बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव

अभिजीत सावंतला बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाण्याची संधी का मिळत नाही? गायकानंच केली संगीतकारांची पोलखोल

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 13 मे: मराठमोळ्या अभिजीत सावंतनं (Abhijeet Sawant) इंडियन आयडलचं (Indian idol) पहिलं पर्व अक्षरश: गाजवलं होतं. विजेतापद पटकवणाऱ्या अभिजीतला या शोनं प्रसिद्धी, पैसा, लोकप्रियता अगदी सर्व काही मिळवून दिलं. यानंतर तो एकामगून एक बॉलिवूड गाण्यांची रांगच लावणार अशी चर्चा होती. (bollywood songs) परंतु काही वर्षांतच काळाच्या पडद्यामागे हे नाव हरवून गेलं आणि इतर गायकांची चर्चा सुरु झाली. परंतु इतकं छान गाता येत असतानाही त्याला बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी का मिळाली नाही? अन् याही पुढे जाऊन विचारायचं झालं तर रिअलिटी शोमध्ये गाणाऱ्या गायकांना चित्रपटांची गाणी का मिळत नाहीत? स्वत: अभिजीतनेच या प्रश्नाचं उत्तर देताना बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव जगासमोर आणलं. बॉलिवूड स्पायला दिलेल्या मुलाखतीत अभिजीतनं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यानं चित्रपटांमध्ये गाण्याची संधी न मिळण्यामागचं खरं कारण सांगितलं. तो म्हणाला, “आपली इंडस्ट्री टॅलेंटवर कमी आणि ओळखींवर जास्त काम करते. बहुतांश संगीतकार आपल्या ओळखीच्या गायकांनाच संधी देतात. त्यांचा एक गट असतो अन् त्या गटामध्ये पोहोचणं बाहेरील गायकांसाठी खुप कठीण असतं. माझ्या बाबतीतही तेच घडलं. इंडियन आयडल जिंकल्यावर माझा प्रवास सुरु झाला. गेल्या 15 वर्षांच्या काळात अनेकांनी मला रिजेक्ट केलं. कारण मी त्यांच्या गटातील गायक नव्हतो. रिअलिटी शोमधील कलाकार रातोरात प्रसिद्ध होतात, त्यांचा खुप मोठा फॅन फॉलोअर्स असतो. मात्र त्यांच्यासोबत काम करायला इंडस्ट्रीमधील कलाकार कंफर्टेबल नसतात. त्यामुळं त्यांना म्हणावी तशी संधी मिळत नाही.” ऐकावं ते नवलंच! सनी लिओनीच्या Bikini पोस्टरमुळं वाचलं शेतकऱ्याचं आयुष्य

अभिजीत सावंत सध्या देश-विदेशामध्ये गाण्यांचे शो करत आहे. इंडियन आयडल जिंकल्यानंतर सोनी वाहिनीनं त्याचा म्युझिक अल्बम लॉन्च केला होता. मात्र त्यानंतर त्याला कुठल्याच चित्रपटांमध्ये गाण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळं त्यानं चित्रपटांचा नाद सोडून आता लाईव्ह शोवर जास्त लक्ष केंद्रित केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या