JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Mazhi Tuzhi Reshimgaath : अखेर यशसमोर येणार अविनाशचं सत्य; मालिकेत जबरदस्त ट्विस्ट

Mazhi Tuzhi Reshimgaath : अखेर यशसमोर येणार अविनाशचं सत्य; मालिकेत जबरदस्त ट्विस्ट

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका आता अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. येणाऱ्या काळात मालिकेत जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. त्याचा परिणाम यश आणि नेहाच्या नात्यावर होणार आहे.

जाहिरात

Mazhi Tuzhi Reshimgath

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 ऑगस्ट : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. नेहा आणि यशाच्या सुखी संसारात नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एंट्री झाल्यापासून मालिकेत अनेक घडामोडी घडल्या आहेत.  नेहाला अविनाशने खोटं  बोलून फसवलं होतं. त्याने ‘मला कॅन्सर झाला आहे अन मी आता काहीच दिवस जगणार आहे’ असं नेहाला सांगितलं होतं. त्यामुळे नेहाने त्याला पॅलेसवर काम करण्यासाठी होकार दिला होता. पण नेहा अविनाशच्या जाळ्यात पूर्णपणे अडकली आहे. अविनाश नेहा आणि यशामध्ये दुरावा आणण्याचं काम करत आहे. त्याच्या डावात तो लवकरच यशस्वी होणार असं दिसतंय. येणाऱ्या काळात मालिकेत जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत प्रेक्षकांना अलीकडेच एक ट्विस्ट पाहायला मिळाला होता. अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचे सत्य सिम्मीसमोर आलं होतं. सिम्मी काकू  याच गोष्टीचा फायदा घेऊन नेहाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे नेहाच्या अडचणीत वाढ झाली आहे. सिम्मीला सत्य कळल्यानंतर तरी नेहा यशला पहिल्या नवरा म्हणजेच अविनाश असल्याचे सांगणार का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. पण आता अखेर यशला सगळं सत्य समजलं आहे.

संबंधित बातम्या

येत्या १५ ऑगस्टला मालिकेचा महाएपिसोड प्रदर्शित होणार आहे.त्या भागाचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. त्यामध्ये यशला अविनाश नेहाचा पहिला नवरा आहे हे सत्य समजलं आहे.आणि त्याला नेहाने जाणूनबुजून त्याच्यापासून सत्य लपवलं असं वाटतं. त्याला या गोष्टीचा प्रचंड धक्का बसला आहे. या व्हिडीओनुसार, नेहा यशला अविनाशाबद्दल सगळं खरं सांगण्याचं ठरवते. ते सिम्मी काकूला समजतं. हेही वाचा - Star Pravah Ganeshotsav : स्टार प्रवाह गणेशोत्सव सोहळ्यात प्रेक्षकांना मिळणार अष्टविनायकाची माहिती; कलाकारांचे हटके लुक आले समोर यशलाही सत्य ऐकून खूप मोठा धक्का बसतो. यश नेहाला घराबाहेर काढणार आहे. यश समजतो कि नेहाने त्याचा खूप मोठा अविश्वासघात केला आहे. तो म्हणतोय, ‘नेहाने दुसरं काहीही केलं असतं  तरी मी एवढा चिडलो नसतो. पण तिने माझा विश्वासघात केला आहे.’ असं म्हणून तो नेहाला घराबाहेर काढतो. या ट्विस्टमुळे मालिका आता अत्यंत उत्कंठावर्धक  वळणावर आली आहे. आता यशला नेहाबद्दल नक्की काय समजलं आहे. तो थेट नेहाला घराबाहेर का काढणार आहे तसेच पहिल्या नवऱ्यामुळे नेहा आणि यशचा संसार फिस्कटणार का?  अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या