**मुंबई, 15 डिसेंबर -**अभिनेत्री इलियाना डिक्रूझने ( Ileana Dcruz) अलीकडेच मालदीवच्या व्हेकेशनचे फोटो शेअर केले होते. पांढऱ्या बिकिनीतील इलियानाचे सुंदर फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत होते. अनेकांनी तिच्या या फोटोंचे कौतुक केले तर काहींनी तिला ट्रोल केले. या बिकिनी फोटोंवर अनेकांनी इलियानालाही बॉडी शेम केले आहे. फोटोमध्ये इलियाना पांढऱ्या रंगाची स्ट्रॅपलेस बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. सनबाथ घेताना आणि पाण्यात उभे असतानाचे फोटो तिनं शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून लोक इलियानावर निशाणा साधत आहेत. इलियानाच्या फिगरवर यूजर्सने बऱ्याच कमेंट केल्या आहेत. काहींनी तिला ’ फ्लॅट चेस्ट’ असं म्हणत तिला ट्रोल केलं आहे. काहींनी तर याहूनही अश्लील कमेंट्स केल्या आहेत. वाचा : रणवीर सिंहने सर्वांनासमोर दीपिकाला केलं KISS! त्यांनतर जे घडलं…. एका यूजरने लिहिले आहे की, ‘तुझ्याकडे फक्त एक बिकिनी आहे का ?’. तर दुसऱ्याने लिहिले आहे की ‘तुला काय दाखवायचे आहे.’ दुसर्या युजरच्या कमेंट्स पाहता तो इलियानाच्या बिकिनी फोटोंमुळे चांगलाच संतापल्याचा दिसत आहे. त्याने लिहिले आहे की, ‘ही मुलगी काय करतेय!!! ती बर्याच दिवसांपासून सतत बिकिनी फोटो टाकत आहे, तिला न्यूडिटी खूप आवडू लागली आहे का.
इलियानाला यापूर्वी देखील बॉडी शेमचा सामना करावा लागला आहे. तिच्या फॅशनेबल आउटफिट्समध्येही तिला ट्रोलचा सामना करावा लागला आहे. इलियाना एकदा बॉडी शेमिंगबद्दल उघडपणे बोलली होती. लहानपणापासूनच अशा कमेंट्स ऐकत असल्याचं ती म्हटली होती. . मात्र, काही काळानंतर इलियानाने लोकांच्या बोलण्याकडं लक्ष द्यायचे सोडले. त्यानंतर तिनं तिच्या कामावर लक्ष केंद्रित केले. आज ती एकदम बेधडकपणे तिचे फोटो शेअर करते. वाचा- Ankita-Vicky Wedding: अंकिता लोखंडेने विकी जैनसोबत बांधली लग्नगाठ इलियानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच इलियाना डिक्रूझचा ‘द बिग बुल’ हा चित्रपटात दिसली होती. इलियानाने बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. इलियानाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एका तेलगू चित्रपटातून केली. यानंतर तिने देवदासू, केडी, खतरनाक अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा आगामी चित्रपट तेरा क्या होगा लवली आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा देखील आहे. इलियाना चित्रपटांसह तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते.