मुंबई, 30 जून- बॉलिवूडमध्ये सध्या रणवीर सिंगच्या आगामी ‘८३’ सिनेमाचीच जोरदार चर्चा आहे. या सिनेमाचा सहनिर्माता असलेला मधू मंटेनाने नुकताच एक नवीन खुलासा केला आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांनी म्हटलं की, १९८३ मध्ये ज्या पद्धतीने वर्ल्ड कप जिंकलो, त्याचपद्धतीने यावर्षीही जर वर्ल्ड कप जिंकलो तर क्रिकेटवर अजून एक सिनेमा तयार करण्यात येईल. हा सिनेमा २०१९ च्या वर्ल्ड कपवर आधारित असेल. मंटेना पुढे म्हणाला, ‘‘८३’ नंतर जर २०१९ मध्येही जर भारत वर्ल्ड कप जिंकतो तर आम्ही या विजयावरही एक सिनेमा करू इच्छितो.’ प्रोडक्शनशी निगडीत एका व्यक्तिने सांगितले की, यासंबंधीत चर्चा सुरू झाली असून मधु या सिनेमाची निर्मिती करायला उत्सुक आहे. त्याने या सिनेमावर बोलणी सुरू केली आहेत. 19 हजारांमधून झाली होती निवड, आता Zaira Wasim ला झालंय तरी काय? विशेष म्हणजे रणवीर सिंग ‘८३’ या सिनेमात कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. ज्यावेळी या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती तेव्हापासूनच हा सिनेमा चर्चेत आहे. ‘८३’ हा सिनेमा हिंदीसह तमिळ आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे. असं म्हटलं जातं की, हा सिनेमा देशातील खेळावर तयार करण्यात आलेला सर्वात मोठा सिनेमा ठरणार आहे. पुढच्या वर्षी १० एप्रिल रोजी हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे. रणवीर सिंगसोबत दिग्दर्शक कबीर खानहा पहिला सिनेमा आहे जो तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. World Cup- स्पृहाने विराटची डोकेदुखी केली दूर! VIDEO: कंडक्टर मुलीला आंटी म्हणाला आणि बसमध्ये झाला राडा