JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवर कमेंट करणं पडलं महाग, ट्रोल झाली अभिनेत्री Huma Qureshi | Ind vs End | ICC World Cup | Virat Kohli |

टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवर कमेंट करणं पडलं महाग, ट्रोल झाली अभिनेत्री Huma Qureshi | Ind vs End | ICC World Cup | Virat Kohli |

Huma Qureshi | Ind vs End | ICC World Cup | Virat Kohli | कुरेशीने भगव्या रंगाची जर्सी नको असल्याचं का म्हणाली? भगवा रंग तिरंग्यातही आहे तर जर्सीमध्ये असला तर काय झालं?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 जुलै- बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी ही आपलं मत सर्वांसमोर व्यक्त करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून हुमा लैला या वेब सीरिजमुळे चर्चेत आली आहे. पण यावेळी ती चर्चेत येण्याचं कारण वेगळं आहे. रविवारी ३० जून रोजी भारत आणि इंग्लंड सामन्यादरम्यान तिने भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर कमेंट केली. नेमकी याच कारणामुळे ती ट्रोल होत आहे.

झायरा वसीमच्या निर्णयावर अब्बू आझमी आणि शिवसेनेत जुंपली! त्याचे झाले असे की, भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान, नेहमीच्या निळ्या जर्सीएवजी भगव्या रंगाची जर्सी घातली होती. दोन्ही संघांच्या जर्सीचे रंग समान असल्यामुळे भारतीय संघाला भगव्या रंगाची जर्सी देण्यात आली होती. हा बदल फक्त एकाच सामन्यासाठी करण्यात आला होता. हुमाने ट्विटरवर याबद्दल आपलं मत व्यक्त केलं. ट्वीट करत ती म्हणाली की, ‘अंधविश्वासाचा प्रश्न नाहीये. पण आम्हाला निळ्या रंगाची जर्सीच परत मिळू शकते का? इनफ सेड’

संबंधित बातम्या

जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात

रणदीप हुड्डाने पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत, म्हणाला ‘लवकरात लवकर अॅक्शन घ्या’ हुमाच्या याच ट्वीटवर तिला ट्रोल केलं जात आहे. हुमाने भगव्या रंगाची जर्सी नको असल्याचं का म्हणाली? भगवा रंग तिरंग्यातही आहे तर जर्सीमध्ये असला तर काय झालं? काहींनी म्हटलं की, एकाच दिवसासाठी जर्सीचा रंग बदलला तर हुमाला एवढं बोलायची काय गरज होती. काहींनी ट्विटर युझरने हुमाला अनेक गोष्टी ऐकवल्या. जेजुरीत माऊलींच्या पालखीचा मुक्काम, पाहा गडाचा अवर्णनीय Exclusive VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या