JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मला गोमांस खायला आवडतं'; Boycott Brahmastra दरम्यान रणबीरचा 'तो' व्हिडीओ चर्चेत

'मला गोमांस खायला आवडतं'; Boycott Brahmastra दरम्यान रणबीरचा 'तो' व्हिडीओ चर्चेत

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा बॉयकॉट ट्रेंड सुरु झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे सगळेच चित्रपट सध्या बॉयकॉटच्या कचाट्यात सापडत आहेत. यामध्ये मोठमोठ्या सुपरस्टार्सच्या चित्रपटांचाही समावेश आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 ऑगस्ट: बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा बॉयकॉट ट्रेंड सुरु झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे सगळेच चित्रपट सध्या बॉयकॉटच्या कचाट्यात सापडत आहेत. यामध्ये मोठमोठ्या सुपरस्टार्सच्या चित्रपटांचाही समावेश आहे. अशातच बॉयकॉटच्या ट्रेंडमध्ये आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. हा चित्रपट दुसरा तिसरा कोणता नसून बहुप्रतिक्षीत ‘ब्रम्हास्त्र’ आहे. ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ हा ट्रेंड काही दिवसांपासून सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. बॉयकॉटच्या वादात चित्रपट सापडत नाही तोच चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्यानं म्हणजेच रणबीर कपूरनं एक वादग्रस्त विधान केल्याचं पहायला मिळालं. याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. ‘ब्रम्हास्त्र’ च्या चर्चेदरम्यान रणबीरचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये रणबीर म्हणताना दिसतोय की,“मला गोमांस खायला आवडतं”. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी म्हटलं की, आम्ही गोमांस खाणाऱ्या कलाकाराला प्रोत्साहन देत नाही. रणबीर त्याच्या जुन्या वक्तव्यावरुन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय शिवाय त्याचा आगामी बहुप्रतिक्षित चित्रपटही बॉयकॉटच्या कचाट्याच सापडला आहे. हेही वाचा -  Pushpa 2 Star Fees: पुष्पा 2 साठीची अल्लू अर्जुनची फी ऐकून बसेल धक्का, त्यासमोर रश्मिकाही फिकी बॉयकॉटच्या शर्यतीत प्रेक्षकांनी अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटही गुंडाळला आहे. अशा परिस्थितीत 9 सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून बॉलिवूडला खूप अपेक्षा आहेत. त्यातच स्टोरी लीक झाल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे आता चित्रपटाची जादू कमी तर होणार नाही ना?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान, बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित चित्रपट म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’. हा चित्रपट सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर स्टारर या चित्रपटाची अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होत आहे. या दोघांव्यतीरिक्त चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, नागार्जुन, दीपिका पदुकोण अशी तगडी स्टार कास्ट पहायला मिळणार आहे. या चित्रपटाविषयी अनेक निरनिराळी माहिती समोर येत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या