JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ह्रता दुर्गुळेला वाटतंय 'तो' दिवस कधीच संपू नये.., अभिनेत्रीची नवीन पोस्ट चर्चेत

ह्रता दुर्गुळेला वाटतंय 'तो' दिवस कधीच संपू नये.., अभिनेत्रीची नवीन पोस्ट चर्चेत

ह्रता नुकताच तिचा एक फोटो शेअर करत एका ओळीची पोस्ट केली आहे. सध्या तिची ही पोस्ट सर्वांचे लक्षवेधून घेत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 जून- मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) मागच्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. याशिवास तिच्या टाईमपाय 3 या सिनेमामुळे देखील सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. हनिमूनवरून परत आल्यापासून हृता कामात व्यस्थचं आहे. असं जरी असलं तरी ती या सगळ्यातून वेळ काढत तिचे लग्नातील सुंदर क्षणांचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. चाहते नेहमीच हृता दुर्गुळेबद्दल नवीन काहींना काही जाणून घेण्याबद्दल उत्सुक असतात. तिचा प्रचंड चाहता वर्ग आहे. आता ह्रता नुकताच तिच्या लग्नातील एक फोटो शेअर करत एका ओळीची पोस्ट केली आहे. सध्या तिची ही पोस्ट सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. ह्रताने तिचा लग्नातील एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं तितकीच सुंदर कॅप्शन देखील दिली आहे. तिनं म्हटलं आहे की, हा दिवस कधीच संपू नये असं वाटतं..असं म्हणतं तिनं तिच्या लग्नाची तारीख खाली पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून हार्टचा पाऊस पडत आहे. ह्रता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि प्रियकर प्रतीक शाह (Prateek Shah) यांनी 18 मे रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाचे सुंदर फोटो शेअर करत ह्रताने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. मराठी मनोरंजन विश्वातील काही कलाकारांनी या सोहळ्यास हजेरी लावत या जोडीला आशिर्वाद दिले होते.

संबंधित बातम्या

हृताने दुर्वा मालिकेतून छोड्या पडद्यावर पदार्पण केले. यानंतर ती फुलपाखरू मालिकेत दिसली. या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. पुढे सिंगिंग स्टार या रिऍलिटी शोमध्ये सूत्रसंचालन करताना ती दिसली. दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक आणि स्ट्रॉबेरी शेक ही शॉर्टफिल्म तिने अभिनित केली. अनन्या या चित्रपटातून हृता प्रथमच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे हा चित्रपट तिच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट व ड्रीमविवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव यांच्या अनन्या या आगामी चित्रपटातून हृता एक आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. वाचा- ‘चंद्रा’वानी फुललं अमृता खानविलकरचं रूप, ‘चंद्रमुखी’चा व्हाईट साडी लुक घालतोय धुमाकूळ हृताने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी पुढचं पाऊल या लोकप्रिय मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केली होती. हृता ही मूळची कोकणातली मात्र ती लहानाची मोठी झाली ती मुंबईत झाली. रामणारायन रुईया कॉलेजमधून शिक्षण घेत असताना तिला अभिनय क्षेत्राची ओढ लागली. आज हृता छोट्या पडद्यावरील यशस्वी अभिनेत्रीपैकी एक आहे. आता ती मोठा पडद्या गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या