JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Hruta Durgule: 26 जुलै हृता-प्रतीकसाठी आहे सुपर स्पेशल; कपलचा रोमँटिक VIDEO आला समोर

Hruta Durgule: 26 जुलै हृता-प्रतीकसाठी आहे सुपर स्पेशल; कपलचा रोमँटिक VIDEO आला समोर

हृता आणि प्रतीक या जोडीचा रोमँटिक अंदाज तर कायमच चाहत्यांना पसंत पडताना दिसून आला आहे. या जोडीसाठी आजचा दिवस बराच खास असल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 जुलै: मराठी सिनेसृष्टीतील एक चर्चित कपल म्हणजे हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह. हृता आणि प्रतीक यांच्या जोडीची चर्चा नेहमीच होताना दिसते. हे दोघेही एकमेकांविषयी नेहेमीच प्रेम व्यक्त करताना दिसत असतात. हृता आणि प्रतीक (hruta durgule & prateek shah) यांच्यासाठी आजचा दिवस बराच स्पेशल आहे अशी माहिती समोर येत आहे. हृताने आज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक स्पेशल विडिओ शेअर करून चाहत्यांना या गोष्टीची माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये हे कपल भलत्याच रोमँटिक अंदाजात दिसून येत आहे. या स्पेशल व्हिडिओला कॅप्शन देत हृता लिहिते, “26 जुलै, आमच्यातलं प्रेम लक्षात ठेवण्याचा हा अत्यंत स्पेशल दिवस/ तारीख. आम्हाला असाच आनंद अनुभवता येउदे अशी अपेक्षा”. हृता आणि प्रतिकच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत कपलचं अभिनंदन केलं आहे. हृता आणि प्रतीक यांच्या लव्हस्टोरीमध्ये आजच्या तारखेला बरंच महत्त्व आहे अशा अनुषंगाने हृताने हा स्पेशल व्हिडिओ शेअर केल्याचं सांगितलं जात आहे. हृता आणि प्रतीक यांच्या जोडीवर सुरुवातीपासूनच चाहते भरभरून प्रेम करताना दिसून आले आहेत. आणि हे दोघेही सोशल मीडियावर एकमेकांबद्दल बरेच अपडेट देताना दिसत असतात. हृता आणि प्रतीक यांच्या लग्नाबद्दल आणि हनिमूनबद्दल सुद्धा तुफान चर्चा झाली होती.

संबंधित बातम्या

हृता सध्या तिच्या वर्क फ्रंटवर कमालीची सक्रिय आहे. सध्या तिच्या अनन्या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तर येत्या शुक्रवारी येणारा टाईमपास 3 सुद्धा तिचं एक वेगळं रूप प्रेक्षकांना दाखवणार आहे. हृताचा नवरा प्रतीकसुद्धा तिच्या करिअरमध्ये तिला नेहमीच सपोर्ट करताना दिसून आला आहे. हृताच्या करिअरमधील महत्त्वाच्या प्रोजेक्टबद्दल येणाऱ्या बातम्यानंतर हृताच्या नवऱ्याला अनेक ठिकाणहून ट्रोल करण्यात येत होतं. हे ही वाचा-  26 July: मुंबईकर कधीही विसरणार नाहीत त्या दिवशी भर पावसात ‘या’ अभिनेत्यानं केलं होतं असं काम की तुम्ही कराल सलाम! हृताने नवऱ्याच्या सांगण्यावरून मालिका आणि नाटक सोडलं असा वावड्या उठताना दिसत होत्या. मात्र हृताने या प्रकरणात आपलं मत व्यक्त करत असा असंवेदनशील चाहतावर्ग नसावा असं आवाहन तिच्या चाहत्यांना केलं होतं. पण याउलट हृता आणि प्रतीकच्या जोडीवर एक मोठा चाहतावर्ग भलताच फिदा असतो आणि त्यांना एकत्रितपणे ‘हृतिक’ असं संबोधलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या