JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Zee Marathi वर पुन्हा नवी मालिका; चक्क प्रेक्षकांनी दाखवली उत्सुकता

Zee Marathi वर पुन्हा नवी मालिका; चक्क प्रेक्षकांनी दाखवली उत्सुकता

झी मराठीवर नव्या मालिकांचा सिलसिला सुरूच आहे. आता लवकरच नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे कोणती मालिका रामराम ठोकणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

जाहिरात

हृदयी प्रीत जागते

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 ऑक्टोबर : मागच्या काही महिन्यांपासून झी मराठीवर सातत्यानं नव्या मालिकांचा सिलसिला सुरू आहे. होम मिनिस्टर वगळता सगळ्या मालिका नव्या आहेत. नुकतीच दार उघड बये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर आता नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. झी मराठीवर ‘हृदयी प्रीत जागते’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे नव्या मालिकेचा प्रोमो पाहून चक्क प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे. मागचे काही महिने झी मराठीवरील मालिकांना प्रेक्षकांनी प्रचंड ट्रोल केलं. मात्र ‘हृदयी प्रीत जागते’ या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी मालिका चांगली असेल अशी शक्यता वर्तवली आहे. ‘हृदयी प्रीत जागते’ या मालिकेचा प्रोमो पाहून ही मालिका म्युझिकल बेस असणार आहे असं दिसून आलं आहे. मालिकेचं टायटल साँगचं वाहिनीनं प्रदर्शित केलं आहे. एक रिदमचा बादशाहा आणि एक सुरांची राणी अशी दोघांची जुगलबंदी मालिकेत पाहायला मिळणार आहे. एका नव्या आणि फ्रेंश जोडीची फ्रेश प्रेम कहाणी या मालिकेतून पाहायला मिळणार आहे.  ‘हृदयी प्रीत जागते’ ही मालिका येत्या 7 नोव्हेंबरपासून सोमवार ते शनिवारी रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. झी मराठीवरील प्राइम टाइमच्या सगळ्याच मालिका चांगल्या असतात असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. याचाच अर्थ 8 वाजता सुरू असणारी तू तेव्हा तशी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे असं दिसत आहे. याबाबत माहिती समोर आलेली नाही. हेही वाचा - Aai kuthe kay karte : अखेर तो क्षण आलाच! अरुंधती देणार आशुतोषला आयुष्यभर साथ देण्याचं वचन?

संबंधित बातम्या

‘हृदयी प्रीत जागते’ या मालिकेत अभिनेता सिद्धार्थ खिरिड प्रमुख भूमिकेत आहे. सिद्धार्थ याआधी फ्रेशर्स सारख्या मालिकेत दिसला होता. तर सध्या तो मुलगी झाली हो या मालिकेत सिद्धार्थ भोसलेची भूमिका साकारत होतो. सप्टेंबर महिन्यातच सिद्धार्थनं ही मालिका सोडली. मालिका सोडताना त्यानं खास पोस्ट देखील शेअर केली होती.  तर नवोदित अभिनेत्री पूजा कातुर्डे या मालिकेत प्रमुख नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.  मालिकेच्या टायटल साँगवरून मालिका धम्माल असेल असं दिसतंय. गायिका प्रियांका बर्वे आणि रोहित राऊत यांनी टायटल साँग गायलं आहे.

मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी कधी नव्हे त्या चांगल्या कमेंट्स केल्या आहेत. एका युझरनं म्हटलंय, “मालिका इंटरेस्टिंग दिसतेय. मन उडू उडू झालं आणि फुलपाखरू या दोन्ही मालिका रात्री 8च्या स्लॉटला होत्या. ही मालिकाही रॉकींग असेल’’.  तर दुसऱ्या युझरनं, “कमाल आहे प्रोमो. मला असंच काही तरी पाहायचं होतं”, असं म्हटलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या