Hrithik Roshan
मुंबई, 7 मार्च: गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडचा हँडसम हंक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) त्याची रुमर्ड गर्लफ्रेंड अभिनेत्री सबा आझाद (Saba Azad) मुळे चर्चेत आला आहे. अनेकवेळा दोघे स्पॉटदेखील झाले आहेत. आता तिच्याचमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. सबा आझादने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओवर त्याने फ्लर्टी कमेंट केली जी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सबाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती सत्यजित रे यांच्या क्लासिक चित्रपट गुपी जाने बाघा बायनेमधील बंगाली गाणे गुणगुणताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना सबाने सांगितले की, लहानपणी तिने अल्बमचे प्रत्येक गाणे शिकले होते, मात्र तेव्हा तिला भाषा समजत नव्हती. व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये , ‘मी घरी आजारी आहे आणि माझ्याकडे गाण्याशिवाय दुसरे काही करण्याची ताकद नाही. मी लहान असताना, माझ्या पालकांनी मला ‘गोपी जाने बाघा बायने’ या क्लासिक चित्रपटाच्या साउंडट्रॅकसाठी कॅसेट टेप दिली, काही दिवसांनी आम्ही तो एका महोत्सवात पाहिला. मला त्यावेळी बांगला कळत नव्हते, तरीही ती पटकन माझी आवडती कॅसेट टेप बनली आणि मी अल्बममधील प्रत्येक गाणे शिकले. असे म्हटले आहे.
तसेच ती पुढे म्हणाली, शब्दाचा अर्थ न समजल्याशिवाय. संगीताच्या बाबतीतही तेच सत्य आहे. भाषेचा तुमच्यावर परिणाम होत असेल तर काही फरक पडत नाही! काही दिवसांपूर्वी मी मित्रांसोबत बसून हे गाणे गायले तेव्हा मला समजले की हे गाणे मला अजूनही आठवते. सबाच्या व्हिडिओवर कमेंट करताना हृतिक रोशनने लिहिले- ‘तू एक असामान्य व्यक्ती आहेस.’ हृतिकच्या या कमेंटवर सबानेदेखील तितक्याच प्रेमाने रिप्लाय दिला. तू सर्वात दयाळू हृतिक रोशन आहेस.’ असे तिने कमेंटमध्ये म्हटले आहे. दोघांचीही प्रतिक्रिया पाहात चाहतेदेखील त्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत. हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या लिंक-अपच्या चर्चा बी-टाऊनमध्ये सुरू आहेत. मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर हात धरताना दिसल्यापासून हे जोडपे चर्चेत आले आहे.