JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Fighter Poster: भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट 'फायटर' या दिवशी होणार प्रदर्शित; फर्स्ट पोस्टर रिलीज

Fighter Poster: भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट 'फायटर' या दिवशी होणार प्रदर्शित; फर्स्ट पोस्टर रिलीज

‘विक्रम वेधा’ नंतर अभिनेता हृतिक रोशन आता ‘फायटर’ हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत सुरुवातीपासूनच बरेच बदल करण्यात आले आहेत. पण आता या एरियल अॅक्शन ड्रामा ‘फायटर’ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे

जाहिरात

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 ऑक्टोबर: आपल्या जबरदस्त डान्स आणि लूकसाठी ओळखला जाणारा बॉलिवूडचा देखणा अभिनेता हृतिक रोशन त्याच्या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘विक्रम वेधा’नंतर अभिनेता हृतिक रोशन आता  ‘फायटर’ हा चित्रपट  घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत सुरुवातीपासूनच बरेच बदल करण्यात आले आहेत. पण आता या एरियल अॅक्शन ड्रामा ‘फायटर’ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, ‘फाइटर’ 2024 च्या सुरुवातीला प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित होईल. हा चित्रपट भारताच्या सशस्त्र दलांना समर्पित असल्याने, चित्रपटातील कलाकार हृतिक आणि दीपिका पदुकोण हे दोघेही खूप उत्साहित दिसत आहेत. चित्रपटाच्या तारखा चार वेळा बदलल्या हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणशिवाय अनिल कपूरही ‘फायटर’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण भारतीय वायुसेनेच्या पायलटच्या भूमिकेत दिसणार आहेत. 10 जानेवारी 2021 रोजी हृतिक रोशनच्या वाढदिवसाला सिद्धार्थ आनंदने ‘फाइटर’ चित्रपटाची घोषणा केली होती. यापूर्वी हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार होता. आता हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हेही वाचा - दीपिका पादुकोण जिममध्ये नेमकी कोणती एक्सरसाइज करते? कतरिना कैफने शूट केला VIDEO हृतिक-दीपिका स्टारर ‘फायटर’ या चित्रपटात हे दोन्ही कलाकार भारतीय वायुसेनेच्या पायलटच्या भूमिकेत दिसणार आहेत. भारताच्या सशस्त्र दलाच्या शौर्य, बलिदान आणि देशभक्तीला आदरांजली वाहणाऱ्या या चित्रपटात अनिल कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अॅक्शन आणि सस्पेन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदसोबत हृतिक रोशनचा हा तिसरा चित्रपट आहे.याआधी, या दोघांच्या जोडीने 2014 साली ‘बँग बँग’ आणि 2019 चा ब्लॉकबस्टर ‘वॉर’ यांसारख्या चित्रपटांसह मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घातला आहे.

संबंधित बातम्या

‘व्हायकॉम 18 स्टुडिओ’ आणि ‘मार्फ्लिक्स पिक्चर्स’च्या बॅनरखाली निर्मित ‘फाइटर’ हा चित्रपट देशातील पहिला एरियल अॅक्शन ड्रामा चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. चित्रपटाला आकर्षक बनवण्यासाठी आणि प्रेक्षकांना सेल्युलॉइडवर कधीही न पाहिलेला अनुभव देण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी मेहनत घेतली आहे.

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचा ‘फायटर’ हा मनोरंजन उद्योगातील भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट असेल. यापूर्वी आकाशात चित्रित होणाऱ्या दृश्यांसाठी व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. ‘फायटर’ चित्रपटात ही दृश्ये खरी असतील. अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये एरियल अॅक्शन दाखवण्यात आली आहे.  हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच ‘फाइटर’ चित्रपटात स्क्रिन शेअर करणार आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर फायटर चित्रपटाव्यतिरिक्त हृतिक रोशन ‘क्रिश 4’ या चित्रपटात दिसणार आहे. हृतिक रोशन शेवटचा ‘विक्रम वेधा’ चित्रपटात दिसला होता. फायटर या चित्रपटाव्यतिरिक्त दीपिका पदुकोण ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. दीपिका पदुकोण ‘सर्कस’ आणि ‘जवान’ चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे. दीपिका पदुकोण शेवटची ‘गेहराईं’ चित्रपटात दिसली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या