मुंबई 10 मे: शाहिद कपूर हा हिंदी इंडस्ट्रीत चॉकलेट बॉय म्हणून दाखल झाला पण नंतर त्याने आपल्या वडिलांसारख्याच कणखर नायकांच्या भूमिकाही साकारल्या. शाहिद कपूर पडद्यावर जरी बिनधास्त चॉकलेट बॉय दिसत असला तरीही प्रत्यक्ष आयुष्यात मात्र तो लाजराबुजरा आहे. आपलं मीरा राजपुतवर प्रेम आहे हे त्यानं त्याच्या आईला सांगितलं होतं. ते सांगताना खूप लाजत होता. याबद्दल त्याची आई नीलिमा अझीम यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे. शाहिद आणि मीरा यांची भेट एका लग्नात झाली होती आणि नंतर 2015 मध्ये त्यांनी गुरुग्राममध्ये झालेल्या एका खासगी समारंभात लग्न केलं. सध्या शाहिद आणि मीरा या दाम्पत्याला चार वर्षांची मिशा आणि दोन वर्षांचा झैन अशी मुलं आहेत. नीलिमा या मुलाखतीत म्हणाल्या,‘शाहिदचं मीरावर प्रेम आहे हे सांगताना तो खूपच लाजत होता. मी त्यावर काय प्रतिक्रिया देईन याबद्दल त्याच्या मनात शंका होती पण मी तर ते ऐकायला उत्सुक होते. त्यानी मला मीराचा फोटो दाखवला आणि मग नंतर आम्ही भेटलो. मी मीराला भेटल्यावर ती मला खूप गोड, तरुण, उत्साही, प्रेमळ वाटली. मलाही पहिल्याच भेटीत ती आवडली.’ कौन बनेगा करोडपतीमध्ये भाग घ्यायचाय? या 3 गोष्टी असतील तरच व्हाल कोट्यधीश नीलिमा यांनी आपल्या सुनेचं खूप कौतुक केलं होतं. त्या म्हणाल्या,‘ती खूप बुद्धिमान, संवेदनशील आणि समतोल मनाची आहे. ती सुंदर आणि ग्लॅमरस तर आहेच पण त्याचबरोबर आमच्या कुटुंबाला समतोल करण्याची किमया तिनी साधली आहे. तिच्या वयाच्या मानाने ती खूपच संवेदनशील आहे तिनी एका चित्रपट कलाकाराच्या आयुष्यात येऊन त्याचा स्वीकार केला हे फारच आश्चर्यजनक आहे. ती उत्तम गृहिणी आणि शहिदसाठी उत्तम जोडीदार आहे त्याची सखी आहे.’ दरम्यान कालच झालेल्या आंतरराष्ट्रीय मदर्स डेच्या निमित्ताने मीराने नीलिमा यांना इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. नीलिमा यांच्यासोबतचा फोटो मीराने शेअर करून पोस्टमध्ये लिहिलंय,‘मॉम मदर्स डे च्या शुभेच्छा. तुमची सकारात्मकता आणि जगण्याची अदम्य इच्छा आम्हाला प्रेरणा देते. आणि आपण दोघी एकाच विचारांच्या आहोत ते मला फार आवडतं.’ शाहिद कपूरचं वर्कफ्रंटवर काय चाललंय हे जाणून घेणं गरजेचं आहे. तो सध्या जर्सी या स्पोर्ट्स ड्रामामध्ये काम करतोय. मूळ तेलुगू जर्सी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असून तो 5 नोव्हेंबर 2021 ला म्हणजे दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत त्याचे वडिल ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर आणि मृणाल ठाकूर यांच्याही भूमिका असतील. त्याचबरोबर शाहिद अमेझॉन प्राइमच्या एका वेब सीरिजमधून आपला डिजिटल डेब्युही करणार आहे. राज आणि डीके यांनी ही सीरिज दिग्दर्शित केली आहे. तो म्हणाले,‘या मालिकेची कथा मी पहिल्यांदा ऐकली तेव्हाच मला ती खूप आवडली. तेव्हापासून आतापर्यंत काम करायला खूप मजा आली. ही सीरिज प्रेक्षकांसोबत कधी येते आहे याची मलाच उत्सुकता लागून राहिली आहे.’