धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 3 एप्रिल : प्रत्येक व्यक्तीचा लिंगभाव नैसर्गिक आहे. तो शिकून किंवा शिकवून घडवला जात नाही. पण तरीही ट्रान्सजेंडर व्यक्तीकडे पाहताना समाजाची नजर वेगळी असते. ट्रान्सजेंडर्सना समाजात वावरताना अनेकदा त्रास हन करावा लागतो. त्यांना वेळोवेळी अडचणींचा, अपमानाचा सामना करावा लागतो. चांगली नोकरी मिळणे, घर भाड्याने किंवा विकत घेता येणे, समाजामध्ये आदरपूर्वक वागणूक मिळणे, सहज कुणाशी मैत्री किंवा ओळख करुन घेणे या वरवर साध्यासोप्या वाटणाऱ्या गोष्टीही त्यांच्यासाठी कमालीच्या अवघड असतात. मुंबईतील प्रणित म्हणजेच गंगानं या सर्व अडचणींना सामोरं जावून आज स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय. प्रणित ते गंगा प्रवास गांगाचं मुळ नाव प्रणित हाटे आहे. गंगा आज महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. मात्र तिचा प्रणित ते गंगा पर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा होता नव्हता. त्यासाठी तिला लहानपाणापासूनच मोठा संघर्ष करावा लागलाय. गंगानं लहानपणीच अभिनेत्री व्हायचं स्वप्न पाहिलं होतं मात्र ते प्रणित असताना कधीच पूर्ण झालं नाही. पण, गंगा बनून तिनं महाराष्ट्राची पहिली तृतीयपंथी अभिनेत्री होण्याचा बहुमान मिळवलाय. एका मेसेजमुळे मिळाली कलाटणी आणि बनला सेलिब्रेटींना फेटे बांधणारा स्टार! पाहा Video गंगानं आत्तापर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये देखील काम केला आहे. त्याचबरोबर चित्रपटांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारलीय. आता लवकरच हिंदी चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत झळकणार आहे. पीडित महिलांचा मोठा आधार, अन्यायग्रस्तांना ‘इथं’ मिळतो मोफत न्याय! पाहा Video प्रणित ते गंगा या प्रवासात अनेकांनी टोमणे मारले, हिणवलं. चित्रपटसृष्टीत मुलं आणि मुलींनाही अनेक कष्ट करावे लागतात. तिथं आम्ही तृतीयपंथी तर फारच लांब आहोत. लोकांची आमच्याकडं पाहण्याची मानसिकता बदललेली नाही. त्यांच्यामते तृतीयपंथीय हे टेनमध्ये भीक मागू शकतात, वेश्याव्यवसाय करू शकतात किंवा लग्नात नाचू शकतात. त्यापलिकडे ते काहीतरी करू शकतात याची त्यांना कल्पनाच नव्हती. मी आज तीच कल्पना मोडली आहे. एक तृतीयपंथी उत्तम अभिनेत्री होऊ शकते आणि ती सुंदर दिसू शकते हे मी दाखवून दिलंय,’ असं गंगानं सांगितलं.