JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?; हेमांगी कवीची राजकीय भूकंपावर नवी पोस्ट

आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?; हेमांगी कवीची राजकीय भूकंपावर नवी पोस्ट

हेमांगी कवी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. तीनं एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सुरु असलेल्या राजकीय भूकंपाशी संबंधीत आहे

जाहिरात

Hemangi Kavi

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जून :  आपलं मत निर्भिडपणे मांडणारी मराठी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी(Hemangi Kavi). हेमांगी नेहमीच आपलं मत परखडपणे मांडत असताना पहायला मिळते. कोणताही मुद्दा असो वा कोणतंही क्षेत्र असो ती नेहमीच मतं मांडताना दिसते. त्यामुळे ती चर्चेच्या केंद्रस्थानी असलेली पहायला मिळते. अशातच हेमांगी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. तीनं एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सुरु असलेल्या राजकीय भूकंपाशी संबंधीत (Hemangi kavi political post) आहे त्यामुळे जास्तच चर्चेत येत आहे. सध्या महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप सुरु (Political Crisis)आहे. अडीच वर्ष सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं असून सत्ता पालटण्याची शक्यता दिसत आहे. शिवसेना आमदारांनी घेतलेल्या मोठ्या निर्णयानंतर शिवसेना अस्त होणार असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या शिवसेना नक्की कोणाची?, शिंदेची की ठाकरेंची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच स्थितीवर हेमांगी कवीनंही पोस्ट केली आहे. हेमांगीनं तिच्या सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हेमांगीनं म्हटलं की, आता कुणाला खरं वाघ म्हणायचं?. तिच्या या पोस्टवरुन स्पष्ट दिसून येतंय की, तिनं राज्यात आलेल्या राजकीय भूकंपावर प्रश्न उपस्थित केला आहे. हेही वाचा - TRP Alert: इंद्रा दीपू TRPच्या शर्यतीतून बाहेर! या आठवड्यात दिपासह मारली ‘या’ मालिकेनं बाजी

संबंधित बातम्या

हेमांगीची ही पोस्ट अगदी काही कालावधीतच व्हायरल झालेली पहायला मिळत आहे. अनेकांची यावर प्रतिक्रिया येत असून पोस्ट शेअर केली जात असल्याचं पहायला मिळत आहे. या पोस्टवर अनेक मजेशीर कमेंटही आलेल्या पहायला मिळाल्या. अनेकवेळा हेमांगी तिच्या वक्तव्यामुळे ट्रोलही होते. मात्र ती ट्रोलर्सलाही सडेतोड उत्तर देत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या