JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Hemangi Kavi Post: हेमांगी कवीच्या 'त्या' पोस्टला 1 वर्ष पूर्ण; काय होत नेमकं ते प्रकरण?

Hemangi Kavi Post: हेमांगी कवीच्या 'त्या' पोस्टला 1 वर्ष पूर्ण; काय होत नेमकं ते प्रकरण?

मराठी चित्रपटसृष्टीतील बिनधास्त गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे विचार ती स्पष्टपणे मांडते. सध्या ती तिच्या ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसते आहे. पण हे प्रमोशन करताना तिची मागच्या वर्षीची एक पोस्ट पुन्हा चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी हेमांगीची ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. अनेकांनी तिला पाठिंबा देत तिचे कौतुक केले होते. आता तिच्या या पोस्टला एक वर्ष झाल्याने हेमांगीने पोस्ट लिहिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जुलै: मराठी सिनेसृष्टीत असे फार कमी कलाकार आहेत जे अभिनयाबरोबर उत्तम माणूस आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांना समाजात काय सुरू आहे याच भान आहे. आपली मतं परखडपणे मांडण्याची हिंमत आहे. अशी एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. हेमांगी तिच्या सुंदर अभिनयामुळे आणि उत्तम कॉमेडी टायमिंगमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीच मात्र तिच्या सोशल मीडियावर पोस्टमुळे देखील ती अनेकदा चर्चेत आली. हेमांगीचं बाई बुब्स आणि ब्रा हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. हेमांगीला यावरुन प्रचंड ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला होता. काय होत हे नेमकं प्रकरण? अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत त्यावर तिचं मत व्यक्त करत असते. गेल्या वर्षीनं तिच्या घरातील एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तिनं पोळ्या गोल कशा कराव्यात हे दाखवत होती. यात तिनं घातलेल्या कपड्यांवरुन तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. हेमांगीनं अंतर्वस्त्र न घातला मुद्दाम व्हिडीओ केला असं म्हणत तिला टोमणे मारण्यात आले. अनेक वाईट शब्दांत ट्रोल सोशल मीडियावर हेमांगीला ट्रोल करण्यात आलं. हेही वाचा - BTS VIDEO : ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत शेवटी काय घडणार? शेवटच्या सीनचा VIDEO आला समोर ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देण्यासाठी हेमांगीनं फेसबुकवर ‘बाई बुब्स आणि ब्रा’ अशी पोस्ट लिहित नाव ठेवणाऱ्या समाजाला चांगलीच चपराक दिली होती. तिच्या ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. अनेक महिला संघटनांनी तिला ट्रोल केलं होतं. अनेकांनी तिची खिल्ली उडवली होती. वाट्टेल त्या थराला जाऊन तिला घानेरड्या शब्दांत ट्रोल केलं होतं.  हेमांगीला अनेक स्थरातून धमक्या देखील देण्यात आल्या होत्या. मात्र कोणत्याच धमकीला न घाबरता हेमांगीनं या प्रकरणाला धीरानं तोंड दिलं आणि सोशल मीडियावर व्यक्त होण्याची तिची पद्धत तिनं सोडली नाही.  आज तिच्या या पोस्टला एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्तानं हेमांगी पुन्हा एकदा व्यक्त झाली. तिनं एक पोस्ट शेअर करत ‘माझ्या आयुष्यात ‘तमाशा Live’मागच्या वर्षी याच दिवशी सुरू झाला’ असं म्हणत भावना व्यक्त केल्यात.  वाचा हेमांगीची सविस्तर पोस्ट.

संजय जाधवचे मानले आभार या पोस्टमध्ये हेमांगीन दिग्दर्शक संजय जाधव यांचे आभार मानलेत. संजय जाधव दिग्दर्शित तमाशा लाईव्ह हा सिनेमा 15 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ज्यात हेमांगी प्रमुख भूमिकेत आहे. तिनं म्हटलंय, ‘जुलै महिन्याच्या शेवटाला संजय दादांचा ‘तमाशा Live’ साठी call आला आणि दीड दोन महिन्यांचं work shop करून सिनेमा shoot सुद्धा केला आणि आज तो प्रदर्शित होतोय! दादा, या सगळ्या घटनेनंतर ही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात! लोकांनी दाखवलेली भीती खोटी ठरवलीत यासाठी मी कायम ऋणी राहीन! हा सिनेमा तर माझ्यासाठी महत्वाचा आहेच पण मला माझ्यातला आत्मविश्वास जागवण्याची संधी दिलीत त्यासाठी खूप खूप ❤️ मागच्या वर्षी ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ मुळे मी breaking news च्या भोवऱ्यात आले होते आज ‘तमाशा Live’ मुळे बातम्यांच्या वलयात आहे. माझ्या post ची anniversary मी अश्या पद्धतीने celebrate करेन वाटलं नव्हतं!’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या