JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / टीव्हीच्या 'संस्कारी बहू'चे बिकिनी PHOTO व्हायरल, बोल्ड अंदाजामुळे चाहते फिदा

टीव्हीच्या 'संस्कारी बहू'चे बिकिनी PHOTO व्हायरल, बोल्ड अंदाजामुळे चाहते फिदा

अभिनेत्री हिना खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ऑरेंज बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. तिने खूप बोल्ड आणि सेंशूअल फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याने चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 जून : कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे आज अनेकजण घरातच आहेत. बॉलिवूड कलाकार, टेलिव्हिजन कलाकार देखील घरूनच त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. दरम्यान या कलाकारांना त्यांचे सुट्टीचे दिवस आठवू लागले आहे. समुद्रावरील फोटो शेअर करण्याचा ट्रेंडच सोशल मीडियावर बनला आहे. दरम्यान सोशल मीडियावर सक्रीय असणारी हिना खान (Heena Khan) देखील यामध्ये मागे नाही आहे. मात्र तिने पोस्ट केलेल्या ‘बीच फोटो’ मुळे ती चर्चेचा विषय बनली आहे. कारण तिने पोस्ट केलेले बिकिनी फोटो तिने साकारलेल्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है..’ मधील अक्षराच्या भूमिकेच्या अगदी विरोधात आहेत. तिच्या या बोल्ड फोटोंमुळे टेलिव्हिजवरील ‘साधासरळ सुनेच्या’ प्रतिमेपेक्षा हे फोटो काहीसे वेगळे असल्याचं म्हणणं आहे. हिना खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ऑरेंज बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. तिने खूप बोल्ड आणि सेंशूअल फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याने चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तिचे हे एका जुन्या ‘हॉलिडे’चे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत**.** (हे वाचा- बॉलिवूड गाण्यावर निक जोनसचे ठुमके! प्रियांकालाही आवरलं नाही हसू , VIDEO व्हायरल ) हिनाने या फोटोला दिलेलं कॅप्शन वाचून स्पष्ट लक्षात येत आहे की ती लॉकडाऊनला कंटाळली आहे. तिने असं लिहिलं आहे की, ‘मला चिल्ल करण्याचं माझं लायसन्स परत हवं आहे…’. यावरून लक्षात येत आहे की ती तिचे सुट्टीचे दिवस मिस करते आहे.

आधी अक्षराच्या भूमिकेमुळे आणि त्यानंतर बिग बॉसमुळे (Bigg Boss) हिना खान घराघरात पोहोचली. त्यानंतर तिच्यामध्ये झालेला बदल दिसण्या इतपत स्पष्ट आहे. बिकिनीतील फोटो हा त्याचेच एक उदाहरण आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या