JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सरसंघचालकानंतर हार्ड कौरची मोदी-शहांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ट्विटरनं केली 'ही' कारवाई

सरसंघचालकानंतर हार्ड कौरची मोदी-शहांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ट्विटरनं केली 'ही' कारवाई

हार्ड कौरनं ( Hard Kaur ) तिच्या आगामी गाण्याची प्रमोशन क्लिपसुद्धा तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यात ती खालिस्तानी समर्थकांसोबत दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 ऑगस्ट : प्रसिद्ध रॅपर हार्ड कौरचं ट्विटर अकाउंट संस्पेंड करण्यात आलं आहे. सुरुवातीला मोहन भागवत नंतर योगी आदित्यनाथ आणि त्यानंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी अपशब्द वापरल्यानं हार्ड कौरचं ट्विटर अकाउंट बंद करण्यात आलं आहे. हार्ड कौरनं नुकताच तिच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यात मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल अपशब्द वापरताना दिसत होती. यात ती खालिस्तानी समर्थकांसोबत उभी असून हे सर्वजण खालिस्तान चळवळीवर बोलताना दिसत आहेत. 2 मिनिटं 20 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये हार्ड कौरनं पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना चॅलेंज केलं आहे. हा व्हिडिओ तिनं ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर ट्रेंडमध्ये आला होता. यानंतर हार्ड कौरनं तिच्या आगामी गाण्याची प्रमोशन क्लिपसुद्धा तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यात ती याच खालिस्तानी समर्थकांसोबत दिसत आहे. काही शीख समुह बऱ्याच काळापासून एका वेगळ्या देशाची म्हणजेच खालिस्तानची मागणी करत आहेत. प्रभाससोबत रिलेशिपमध्ये आहे अनुष्का, शोधतेय नवं घरं?

याआधी जून महिन्यातही हार्ड कौरवर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला होता. कारण तिनं यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि RSS प्रमुख मोहन भागवत यांच्यावर गंभीर आरोप करत वाईट कमेंट केल्या होत्या. तसेच त्यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिलेल्या होत्या. त्यामुळे तिच्यावर आयपीसी कलम 124 A, 153A, 500, 505 आणि 66 IT कायद्यानुसार केस दाखल करण्यात आली होती. ईदच्या दिवशी सारा अली खान पोहोचली थायलंडच्या मंदिरात!

हार्ड कौरनं ‘जॉनी गद्दार’ सिनेमात ‘मूव युवर बॉडी’, ‘बचना ए हसीनों’मध्ये ‘लकी बॉय’ ही गाणी गायली आहेत. 2011 साली रिलीज झालेल्या पटियाला हाऊस या सिनेमातही ती दिसली होती. या सिनेमात अभिनेत्री अनुष्का शर्माची मुख्य भूमिका होती. या सिनेमाला क्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला आणि अक्षय कुमारच्या बॉलिवूड करिअरमधील यशस्वी सिनेमांच्या यादीत हा सिनेमा सामील झाला होता. ‘तारक मेहता…’मध्ये पुन्हा एकदा होणार दयाबेनची एंट्री, जेठालालनं केला खुलासा ============================================================================ पाकिस्तानच्या सांगण्यावरून शोभा डे यांनी भारत सरकारविरोधात लेख लिहिला?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या