JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Shahid Kapoor: देसीगर्लच्या प्रेमात बुडाला होता शाहिद कपूर; 'त्या' रात्रीच्या घटनेने नात्यात आला कायमचा दुरावा

Shahid Kapoor: देसीगर्लच्या प्रेमात बुडाला होता शाहिद कपूर; 'त्या' रात्रीच्या घटनेने नात्यात आला कायमचा दुरावा

एकेकाळी शाहिद आणि प्रियांका चोप्राच्या अफेअरच्या किस्यांची बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा होती. पण या दोघांच्या ब्रेकअपला त्या रात्री घडलेली एक घटना कारणीभूत ठरली होती. त्यानंतर दोघांचे मार्ग कायमचे वेगळे झाले.

जाहिरात

प्रियांका चोप्रा-शाहिद कपूर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 फेब्रुवारी:  शाहिद कपूर हे बॉलिवूडमधलं लोकप्रिय नाव आहे. त्याने आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे. सोबतच त्याच्या डॅशिंग लुक्सवर तरुण मंडळी फिदा होतात. आज शाहिद एक आदर्श ‘फॅमिली मॅन’ म्हणून बायको आणि मुलांसोबत सुंदर आयुष्य जगत आहे. परंतु एकेकाळी त्याच्या अफेअरच्या किस्यांची बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा होती. प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर सोबतच्या त्याच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त प्रियांका चोप्रा आणि शाहिद कपूर यांच्याबद्दल एक रंजक किस्सा जाणून घेऊया. प्रियांका चोप्रा आणि शाहिद कपूर या दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. यासोबतच त्यांच्या ऑफ स्क्रिन केमिस्ट्रीचीही चांगलीच चर्चा रंगली होती. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. शाहिद आणि प्रियांकाची कहाणी पुढे जाण्याआधीच अशी एक घटना घडली ज्यानंतर प्रियांकाने स्वतःला शाहिदपासून दूर केले आणि त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला. Pooja Bhatt: आलिया भट्टच्या बहिणीने वडिलांसोबतच केलेलं असं काही; ‘त्या’ फोटोनं माजली होती खळबळ प्रियंका चोप्रा आणि शाहिद कपूर यांनी ‘कमिने’ चित्रपटात एकत्र काम केले आणि दोघेही तेव्हाच जवळ आले. पण तेव्हा असं काही घडलं कि दोघांचंही अफेअर जगासमोर उघडं पडलं. त्यादिवशी शाहिद आणि प्रियांका एकत्र असताना प्राप्तिकर विभागाने पहाटे प्रियांकाच्या घरावर छापा टाकला तेव्हा त्यांच्यातील संबंध उघड झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी शाहिद प्रियांकाच्या घरी होता आणि दार ठोठावल्यावर शाहिदनेच दरवाजा उघडला. ही बातमी समोर येताच बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती.

प्रियांकाने काही काळानंतर स्वत: ला शाहिदपासून दूर करण्यास सुरुवात केली. जिथे दोघेही सगळा वेळ एकत्र घालवत असत, तिथे आता प्रियंकाने शाहिदचं तोंड देखील पाहायला नकार दिला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहिद आणि प्रियांकाच्या एका कॉमन फ्रेंडने त्यांच्या ब्रेकअपच कारण सांगितलं होतं की, प्रियंका आता शाहिदपासून दूर जातेय कारण ती एका मोठ्या स्टारच्या जवळ जात आहे. हे ऐकून शाहिदला धक्काच बसला. फिल्मी दुनियेतील या अभिनेत्रींनकडून अशी फसवणूक झाल्यावर  शाहिदने दिल्लीची मुलगी मीरा राजपूतसोबत अरेंज मॅरेज केलं. मीरा आणि शाहिद त्यांच्या दोन मुलांसह आनंदी जीवन जगत आहेत. एकदा करण जोहरच्या प्रसिद्ध शो ‘कॉफी विथ करण’मध्ये शाहिदने नाव न घेता सांगितले की एका प्रसिद्ध सेलिब्रिटीने आपली फसवणूक केली आहे. त्याचा रोख फक्त प्रियांका चोप्राकडे होता असे म्हटले जात होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या