मुंबई, 17 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याचा आज 41 वा वाढदिवस. मुख्यमंत्र्यांचा मुलगा अशी ओळख घेऊन बॉलिवूडमध्ये आलेल्या रितेशनं इथं मात्र वडीलांच्या नाही तर स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. रितेशचा हाउसफुल 4 काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आणि या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. पण या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये एक भन्नाट किस्सा शेअर केला होता. काही वर्षांपूर्वी त्याच्यासोबत असं काही घडलं होतं ज्यामुळे खरं तर त्याला मारही खावा लागला असता… हाऊसफुल 4च्या प्रमोशनसाठी रितेशनं कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये सर्वच कलाकारांनी अक्षय कुमारसोबत काम करतानाचे त्यांचे अनुभव शेअर केले मात्र अभिनेता रितेश देशमुखनं मात्र सर्वांपेक्षा हटके असा अक्षयच्या प्रँकचा किस्सा शेअर केला. अक्षय कुमार प्रँकसाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सनी अक्षयच्या प्रँकचे किस्से शेअर केले आहेत. त्यामुळेच त्याला प्रँकस्टार म्हणून ओळखलं जातं. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या मुलीने केली कमाल! शेअर केले HOT PHOTOS
रितेश म्हणाला, मी आणि अक्षयनं हे बेबी सिनेमात एकत्र काम केलं आहे. त्यावेळी शूटिंग सुरू असताना एक दिवस अक्षयनं एक दिवसा माझ्या फोनवरुन विद्या बालनला I Love You असा मेसेज पाठवला. पण याबद्दल मला काहीही माहित नव्हतं. काही वेळानं विद्यानं मला किसिंग स्माईलीचा रिप्लाय दिला. त्यामुळे मी हैराण झालो. त्यानंतर मी पाहिलं तर विद्याचा फोन अक्षयच्या हातात होता. पण जर हा मेसेज विद्यानं पाहिला असता तर मला मारही खावा लागला असता. सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘दरबार’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO सिनेसृष्टीत झाली १६ वर्ष मस्ती, हाउसफुल मालामाल विकल, धमाल आणि अपना सपना मनी मनी यांसारख्या सिनेमातून रितेशने सिनेसृष्टीत स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. तुझे मेरी कसम या सिनेमातून त्याने आपल्या सिनेकरिअरला सुरुवात केली होती. बॉलिवूडप्रमाणेच रितेश मराठी सिनेमांची निर्मिती करतो. लय भारी, बालक पालक माऊली या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. दीपिका पदुकोण ते सनी लिओनी, या गोष्टींना घाबरतात तुमचे लाडके स्टार्स