JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Makeup Official Teaser- दारू पिऊन घरातल्यांना शिव्या देतेय रिंकू राजगुरू

Makeup Official Teaser- दारू पिऊन घरातल्यांना शिव्या देतेय रिंकू राजगुरू

एका रात्रीत स्टार होणं काय असतं हे रिंकू शिवाय दुसऱ्या कोणाला क्वचितच माहीत असेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 जून- रिंकू राजगुरू हे नाव मराठी प्रेक्षकांसाठी काही नवं नाही. एका रात्रीत स्टार होणं काय असतं हे रिंकू शिवाय दुसऱ्या कोणाला क्वचितच माहीत असेल. सैराट सिनेमानंतर रिंकू तरुणाईच्या गळ्यातली ताईत झाली. सैराट सिनेमा येऊन गेलाही पण आजही आर्चीची अर्थात रिंकूची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. नुकताच तिचा कागर सिनेमा प्रदर्शित झाला. सैराट आणि कागर या दोन्ही सिनेमांमध्ये तिने गावातल्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. पण आता लवकरच रिंकू शहरी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच तिच्या मेकअप सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. बॉलिवूड अभिनेत्रीकडून शिवाजी महाराजांवर वादग्रस्त पोस्ट, सोशल मीडियात खळबळ गणेश पंडित लिखीत आणि दिग्दर्शित मेकअप सिनेमाच्या या टीझरमध्ये रिंकू बांधकाम सुरू असलेल्या एका उंच इमारतीवर मद्यपान करताना दिसते. मद्यधुंद अवस्थेत ती शहराला आणि घरच्यांना शिव्याही देत आहे. तिला मेकअप करायला न दिल्याचा राग तिच्या प्रत्येक वाक्यात दिसतो. हा टीझर पाहून शोले सिनेमातील धर्मेंद्र यांच्या त्या सीनची आठवण आल्यावाचून राहत नाही. टीझरवरून सिनेमाचा विषय नक्की काय असणार याचा अंदाज बांधता येत नसला तरी विषय वेगळा असेल असेच प्रेक्षकांना वाटत आहे. प्रियकराच्या मृत्यूने कोसळली होती मिलिंद सोमणची बायको, लग्नासाठी असं मनवलं घरच्यांना या सिनेमाच्या माध्यमातून गणेश पंडित दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. गणेशने याआधी अनेक नावाजलेल्या  सिनेमांसाठी आणि मालिकांसाठी लेखन केले आहे. यात बालक पालक (२०१२), येल्लो (२०१४), बाळकडू (२०१५) आणि हिचकी (२०१८) या सिनेमांचं लेखन केलं आहे. रुग्णालयात भरती झाली सलमान खानची हिरोइन, PHOTO VIRAL

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या