सासुबाईंच्या बर्थडेला सूनबाई आलियाची पोस्ट चर्चेत
मुंबई, 8 जुलै- ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांचा आज वाढदिवस. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आपल्या उत्तम अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकली. आज नीतू 65 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांची लाडकी सूनबाई आलिया भट्ट हिनं देखील सासूबाईंसाठी खास पोस्ट केली आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. वगेळ्या अंदाजात आलियानं नीतू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आलिया भट्ट आणि नीतू कपूर यांच्या बॉन्डिंगबद्दल कोणाला माहिती नाही. दोघेही एकमेकांचे कौतुक करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोघींची नातं मैात्रिणीसारखं आहे, हे अनेकदा दिसून आलं आहे. नीतू यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त आलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये नीतू काळ्या रंगाच्या टॉपमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. नीतू यांना आलियां राणी असं म्हणतं त्यांचे कौतुक केलं आहे. या पोस्टमध्ये तिनं म्हटलं आहे की, “हॅपी बर्थडे क्वीन. तुम्ही प्रत्येक होष्ट सुंदर करता. तुमच्यावर मी खूप प्रेम करते..आलियाची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. वाचा- ‘जोकरही म्हणा काही हरकत नाही…’ असं का म्हणाली आलिया भट्ट? नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूरने देखील आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक कौटुंबिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये नीतू या खुर्चीवर बसलेल्या आहेत तर रणबीर कपूर, रिद्धिमा कपूर पती भरत साहनी आणि मुलगी अनयरासोबत पोज देत आहे. या फोटोच भाऊ आणि बहिणीचं खास बॉन्डिंग दिसत आहे. पण या फोटोत आलिया भट्ट आणि तिची मुलगी राहा दिसत नाही. रिद्धीमालाही या दोघींची आठवण झाली आहे. फोटो शेअर करताना रणबीरच्या बहिणीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. कुटुंबाचा आधार. (आलिया भट्ट आणि माझी चिमुकली राहा तुला खूप मिस करत आहे).
रिद्धिमाने शेअर केलेला फोटो नीतू कपूर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. फोटोसोबत नीत यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सुंदर संस्मरणीय दिवस. यासोबत यावेळी मी आलिया आणि राहाला खूप मिस करत असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे. नीतू कपूर यांना आलिया आमि नाथ राहा हिची खूप आठवण खूप सतावत असल्याचे त्यांच्या पोस्टमध्ये दिसत आहे.
सध्या नीतू कपूर कुटुंबासोबत इटलीमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. तिथेच त्यांनी वाढदिवसही साजरा केला. रणबीर कपूर तिथे उपस्थित असला तरी आलिया आणि राहा उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यामुळे त्या सध्या आलियाला आणि राहाला खूप मिस करत आहेत.