JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Fatteshikast Trailer : शिवाजी महाराजांनी केलेल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार!

Fatteshikast Trailer : शिवाजी महाराजांनी केलेल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार!

‘फत्तेशिकस्त’ हा सिनेमा शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 ऑक्टोबर : ‘फर्जंद’ या ऐतिहासिक सिनेमात कोंडाजी फर्जंद यांनी गाजवलेल्या पराक्रमाची यशोगाथा मांडल्यानंतर लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘फत्तेशिकस्त’ या आगामी मराठी सिनेमात स्वराज्यातील पहिला ‘सर्जिकल स्ट्राइक’ पहायला मिळणार आहे. त्यामुळे हा सिनेमा मागच्या काही काळापासून चर्चेत होता. नुकताच या बहुप्रतिक्षीत सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. यावेळी सिनेमातील कलाकारांनी ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या वेशभूषेत स्वराज्य स्थापनेसाठीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा व त्यांना प्राणपणाने सोबत करणाऱ्या शिलेदारांचा संकल्पपट रसिकांना उलगडून दाखवला. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य’ निर्मितीसाठी ‘स्वराज्याचा शत्रू तो साऱ्यांचा शत्रू’ या न्यायाने लढले. ‘फत्तेशिकस्त’ हा सिनेमा शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे. भारतातल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार ‘फत्तेशिकस्त’ सिनेमातून अनुभवायला मिळणार आहे. SHOCKING! ‘मला साराचा बॉयफ्रेंड म्हणू नका’ कार्तिक आर्यनची पॅपराजीला विनंती

शिवरायांच्या अष्टावधानी नेतृत्वाची, शौर्याची महती, त्यांच्या साथीदारांचा अजोड पराक्रम, शिस्तबद्ध आखणी या साऱ्यांचा अनुभव देणारा हा सिनेमा नव्या पिढीला खूप काही शिकवणारा असेल. शिवाजी महाराजांचा प्रत्येक गुण आत्मसात करण्याची संधी या सिनेमाच्या निमित्ताने मिळाल्याची भावना कलाकारांनी व्यक्त केली. या सिनेमाचं विशेष असं की, या सिनेमात पुरुष कलाकारांच्या बरोबरीनचं महिला कलाकरांचही योगदान आहे. आजवरच्या बऱ्याच लढायांमध्ये स्त्रियांनीही पुरुषांइतकंच योगदान दिल्याची साक्ष इतिहास देतो. स्वराज्यातील लढायाही याला अपवाद नाहीत.शत्रूची बित्तंबातमी काढण्यापासून, हेरगिरी करण्यापर्यंत आणि त्यांची दिशाभूल करून प्रत्यक्ष लढाईत तलवारबाजी करण्यापर्यंत सर्वच पातळ्यांवर स्त्रीयांनी आपली शक्ती दाखवत शत्रूंना सळो की पळो करून सोडलं आहे. ‘फत्तेशिकस्त’ सिनेमातही स्त्रीशक्तीचे विविध पैलू पहायला मिळणार आहेत. यापैकी काही स्त्रिया पडद्यावर वावरताना दिसणार आहेत, तर काहींनी पडद्यामागं राहून आपलं कौशल्य पणाला लावत ‘फत्तेशिकस्त’ पडद्यावर सादर करण्याच्या आव्हानात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. अॅक्टिंगची हौस! मेंढपाळाने केलेला सलमान खानच्या गाण्याचा VIRAL VIDEO एकदा पाहाच! मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, अंकित मोहन, निखिल राऊत, हरीश दुधाडे,  समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, रुची सावर्ण, अश्विनी कुलकर्णी, नक्षत्रा मेढेकर, प्रसाद लिमये, अमोल हिंगे, ऋषी सक्सेना, सिद्धार्थ झाडबुके यासोबत हिंदीतला प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी यांसारखी तगडी स्टार कास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा येत्या 15 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दीपिका पदुकोणवर आली कपडे विकायची वेळ, वाचा काय आहे कारण ======================================================= SPECIAL REPORT: ठाण्यातील ‘हा’ रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या