मुंबई, 3 मार्च- शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) आणि फरहान अख्तरने (Farhan Akhtar) नुकतीच फ्रेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर शिबानीने लगेच तिच्या इंन्स्टावर तिच्या नावात बदल केला होता. मिसेस अख्तर असा बदल तिनं नावात केला होता. यानंतर ती चर्चेत देखील आली होती. मात्र आता लग्नाला कही दिवस झाले असताना तिनं तिच्या इन्स्टा बायोमध्ये बदल केला आहे. शिबानीनं इन्स्टावर फरहान अख्तरचं सरनेम म्हणजे अडनाव लावलं आहे मात्र मिसेस अख्तर बायोमधून काढलं आहे. तिनं इन्स्टावर तिचा डिस्प्ले फोटो देखील बदलला आहे. तिनं लग्नानंतर तिचं नाव शिबानी दांडेकर-अख्तर असं केलं आहे. तिच्या बायोमध्ये लग्नानंतर तिनं बदल करत म्हटलं होतं की, ‘प्रोड्यूसर, प्रजेंटर, अभिनेत्री, सिंगर आणि मिसेस अख्तर’ ..असा बदल केला होता.
शिबानीने गुरूवारी सासूबाई अभिनेत्री शबाना आझमी यांची आगामी सीरिज ‘हालो’चा टीझर देखील शेअर केला आहे. तिनं म्हटलं आहे की, खूपच भारी टीझर आहे. @halotheseries मध्ये @azmishabana8 यांना पाहण्यासाठी आता वाट पाहू शकत नाही. 24 मार्च सुपर एक्साइटेज आणि सुपर प्राऊड. यापूर्वी शबाना यांनी शिबानी दांडेकरचे घरात स्वागत केलं होतं. शबाना यांनी एक फॅमिली फोटो शेअर करत म्हटलं होतं की, प्रेमळ शिबानीचं कुटुंबात स्वागत आहे. सोबतच त्यांनी हार्ट इमोजी पोस्ट केल्या होत्या.
या फोटोत फरहानची आई हनी इराणी तसेच त्याची मुलगी शाक्या आणि अकीरा देखील दिसत आहेत. फरहाना जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नी हनी इराणी यांचा मुलगा आहे. 19 फ्रेब्रुवारीला फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली.दोघेही खूप वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये या दोघांनी खंडाळ्यात लग्नगाठ बांधली होती. यापूर्वी फरहान अख्तरने अधुना भवानीसोबत लग्नगाठ बांधली होती, अधुना एक प्रसिद्द हेअर स्टायलिस्ट आहे.