इंदूर, 25 जून : लता मंगेशकर यांची भाची राधा मंगेशकर (Lata Mangeshkar’s niece Radha Mangeshkar) यांच्या वक्तव्याबाबत सध्या मोठी चर्चा सुरू आहे. त्यांच्या या वक्तव्यावर चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. काल 24 जून रोजी इंदूरमध्ये त्यांचा एक कार्यक्रम सादर झाला. यापूर्वी त्यांनी बातचीत करताना धक्कादायक वक्तव्य केलं. दैनिक भास्करने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या
वक्तव्यानंतर
त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. काय म्हणाल्या राधा मंगेशकर… आता लोक शास्त्रीय संगीत ऐकत नाहीत. देशात केवळ 1 टक्के लोक असतील जे शास्त्रीय संगीत ऐकत असतील. त्यामुळे जे चाहत्यांना ऐकायला आवडतं, मीदेखील तेच गायीन. शास्त्रीय गायकीतून लोकांचा रस कमी झाला आहे. मला सुगम संगीत गाण्यात आनंद आहे. दरम्यान लती दीदी यांनी दूरदर्शनला दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की, मला आयुष्याकडून काही तक्रार नाही, मात्र शास्त्रीय संगीत सुरू ठेवता आलं नाही याचं दु:ख आहे. ही एक इच्छा अपूर्ण राहिली. लता मंगेशकर यांचा भाऊ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांची मुलगी राधा यांनी 24 जून रोजी इंदूरमध्ये एका कार्यक्रमाचं सादरीकरण केलं. कार्यक्रमाच्या एक दिवस आधी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. दरम्यान त्यांना लता दीदींविषयी विचारण्यात आलं. मात्र त्यांनी लता दीदींबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला.