मुंबई, 19 फेब्रुवारी- नेहमीप्रमाणे यंदाचाही बिग बॉस मराठीचा सीजन तुफान हिट झाला. यातील प्रत्येक स्पर्धक प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरला. यंदाच्या सीजनमध्ये अभिनेत्री अमृता धोंगडे हिनं टॉप 4 मध्ये मजल मारली होती. तिच्या खेळानं प्रेक्षकाचं मन जिंकलं. जरी तिनं ट्रॉफी जिंकली नसली तरी चाहत्यांचे मन मात्र तिनं जिंकण्यात तिनं यश मिळवलं आहे. म्हणून एका चाहत्यानं तिला खास गिफ्ट दिलं आहे. अमृतानं तिच्या इन्स्टावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तिच्यासाठी खास आहेत. विशेष म्हणजे या फोटोत तिच्या हातात एक ट्रॉफी देखील आहे. ही ट्रॉफी तिला तिच्या चाहत्याने गिफ्ट केली आहे. यावर बिग बॉसच्या डोळ्याचं चिन्ह देखील आहे व तिचा फोटो देखील आहे. वाचा- क्रिती सेनन-प्रभास खरंच रिलेशनशिपमध्ये? साखरपुड्याच्या वृत्तांवर अखेर सोडलं मौन एकाद्या कलाकारासाठी याहून मोठी काहीच गिफ्ट असू शकत नाही. अमृतानं देखील या चाहतीचे आभार मानले आहे. वर्षा नलवडे असं या चाहतीचं नाव आहे.
यंदाच्या बिग बॉस मराठीच्या सीजनबद्दल सांगायचे तर अक्षय केळकरने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावावर केली. तर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर या पर्वाची उपविजेती ठरली होती. दरम्यान या सीजनच्या टॉप 4 मध्ये अभिनेत्री आणि कोल्हापूरची लवंगी मिरची म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अमृता धोंगडेने आपलं स्थान निर्माण केलं होतं.
अमृता धोंगडे ही मूळची कोल्हापूरची आहे. अमृताने याआधी झी मराठीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेत काम केलं आहे. यामध्ये तिने ‘सुमी’अर्थातच सुमनची भूमिका साकारली होती. यामध्ये अमृतासोबत अभिनेता तेजस बर्वे झळकला होता. मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेमुळे अमृता धोंगडे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. तर बिग बॉस मराठीमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. या शोमुळे तिला नवी ओळख मिळाली. सोशल मीडियावर देखील ती नेहमी चर्चेत असते.