मुंबई, 26 मे- सध्या देशात बॉलिवूड व्हर्सेस टॉलिवूड (साऊथ इंडस्ट्री) (Bollywood VS Tollywood) असं चित्र रंगलं आहे. ते काहीही असो पण अनेकांनी साऊथ अभिनेत्याचं स्टारडम, चाहत्यांमध्ये असलेली त्यांची क्रेझ या गोष्टी मान्य केल्या आहेत. आत्ताच नव्हे तर अनेक वर्षांपासून साऊथ कलाकारांना चाहत्यांचं प्रचंड प्रेम मिळालेलं दिसून येतं. आज आपण बोलत आहोत साऊथ सुपरस्टार नागार्जुन आक्खीनेनी (Akkineni Nagarjuna) यांच्याबाबत. नागार्जुन यांनी साऊथमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 1997 मध्ये आलेला चित्रपट ‘अन्नमाय्या’ फारच गाजला होता. हा चित्रपट पाहून त्यांच्या एका चाहत्याने त्यांच्यासाठी आता चक्क एक अन्नमाचार्य मंदिर उभारलं आहे.म्हणजे त्यावेळी फक्त पाया काढण्यात आला होता नुकतंच या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.दरम्यान या मंदिराच्या निर्मितीचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या ट्विटरवर एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका प्रचंड मोठ्या मंदिराचं बांधकामाचा सुरु असल्याचं दिसून येत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राउंडला दक्षिणेकडील स्थानिक भाषेतील भक्तिसंगीत लागलेलं ऐकू येत आहे. हे मंदिर अतिशय सुंदर बनत आहे. या मंदिराचं निम्मं बांधकाम झालं आहे. तर अजूनही काही गोष्टी शिल्लक आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘‘हे मंदिर आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथील सुधाकरस्वामी नावाच्या आक्खीनेनी नागार्जुनच्या चाहत्याने 1997 मध्ये ‘अन्नमय्या’ चित्रपट पाहिल्यानंतर बांधले होते. त्याचा पाया घातला गेला होता. मात्र आता 22 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नुकतंच या मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं आहे. यामध्ये सुधाकरस्वामी यांनी आपल्या सहकाऱ्यांकडेसुद्धा सहकार्य मागितलं होतं.अभिनेत्याच्या चाहत्यांनी मंदिर बांधण्यासाठी 1 कोटी 30 लाख रुपये जमा केले होते. अनेक कठीण अडथळे पार करून फॅनने 1 कोटी 30 लाख रुपये खर्चून मंदिर उभारलं आहे. **(हे वाचा:** भारतात होणार Justin Bieber चा लाईव्ह कॉन्सर्ट, पाहा किती असेल तिकिटाची किंमत ) 22 मे 1997 रोजी रिलीज झालेल्या ‘अन्नमाय्या’ने नुकतीच 25 वर्षे पूर्ण केली आहेत. के राघवेंद्र राव दिग्दर्शित, ‘अन्नमाय्या’ हा सर्व काळातील कल्ट क्लासिक तेलुगू चित्रपटांपैकी एक बनला आहे. फक्त देशातच नव्हे तर जगभरात या चित्रपटला प्रचंड पसंती मिळाली आहे. हिंदू संत आणि संगीतकार तल्लापाका अन्नामाचार्य यांच्या 15 व्या शतकातील बायोपिकने प्रत्येकाच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलं होतं. आणि बॉक्स ऑफिसवरही भरपूर कमाई केली होती.