JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / पतीसाठी ओक्साबोक्शी रडली राखी सावंत; म्हणाली तुम्हाला माझी जराशीही दया येत नाही का?

पतीसाठी ओक्साबोक्शी रडली राखी सावंत; म्हणाली तुम्हाला माझी जराशीही दया येत नाही का?

बॉलिवूडची आयटम गर्ल आणि अभिनेत्री राखी सावंत हिचा गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला ड्रामा संपता संपत नाहीय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बॉलिवूडची आयटम गर्ल आणि अभिनेत्री राखी सावंत हिचा गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला ड्रामा संपता संपत नाहीय. राखी सावंतनं पुन्हा एकदा इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या रडगाण्याचे व्हिडीओ शेअर केलेत. या व्हिडीओच्या माध्यमातून राखीनं आपल्या पती तिच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. आपलं रडगाणं गात राखी सावंत शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगत आहे की, “आप जो बोलोगे मैं करूंगी, जो बोलोगे सुनूंगी, लेकिन हमें इग्नोर मत करो यार, मत करो. आपको मेरे ऊपर जरा सा भी तरस नहीं आता है ना? मैं बहुत प्यार करती हूं आपको.”

(वाचा : बॉलिवूडच्या या अभिनेत्याने बायकोला ठेवलं होतं बॉइज हॉस्टेलमध्ये आणि… ) एवढंच नाही तर यानंतर राखी सावंतनं दुसरा व्हिडीओदेखील शेअर केला. यामध्ये ती डबस्मॅश करताना दिसत आहे. यामध्ये ती म्हणतेय की,‘कोणतीही स्त्री जगातलं मोठ्यातलं मोठं दुःख सहन करू शकतं. पण पती तिच्यासोबत असल्यासच हे शक्य आहे’.

संबंधित बातम्या

(वाचा : अभिनेत्रीने शेअर केला वॉटर डिलीव्हरीचा लाइव्ह फोटो, हा अनुभव तुम्ही वाचाच! ) यानंतर ड्रामा क्वीन राखी सावंतनं आपल्या रडगाण्याची सीरिजच सुरू केल्याचं दिसलं. आणखी एका व्हिडीओमध्ये ‘जिंदगी इंतिहान लेती है’ या प्रसिद्ध गाण्यावर राखी अॅक्टिंग करताना दिसत आहे.  आणखी एका व्हिडीओमध्ये ‘हम दोनों दो प्रेमी’ या गाण्यातील ‘ऐसा ना हो कभी छोड़ दे तू मेरा साथ’ ओळीवर राखीनं आपलं रडगाणं दाखवलं आहे.

जाहिरात

(वाचा :  Saand Ki Aankh Trailer: ‘तीन चार की जिंदगी बनान खातर तेरी एक की जानभी लेनी पड़ जाए तो कोई हरज ना है..’ ) शेवटच्या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राखी सावंत बरीच उद्ध्वस्त दिसत आहे. यामध्ये तिनं नेहमीप्रमाणे डायलॉगबाजीदेखील केली आहे. ‘‘किसने कहा मेरी जिंदगी में तकलीफें नहीं हैं. बस मैंने अपनी हालत पर हंसना सीख ली है’’, असा डायलॉग मारत राखीनं आपला ड्रामा सादर करण्याची संधी काही सोडली नाही.

जाहिरात

काही दिवसांपूर्वी राखीनं लग्न केल्याचं जाहिररित्या सांगितलं होतं. तिनं दिलेल्या माहितीनुसार, एका परदेशी चाहत्यानं तिला प्रपोज केलं आणि यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे दोघांनी लग्न थाटल्याचंही तिनं सांगितलं. पण राखी सावंतचा पती दिसायला आहे तरी कसा? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पण लग्नानंतर आपला पती आपल्यापासून दूर राहतोय आणि दुर्लक्ष करतोय, असा आरोप राखी वारंवार करत आहे.

जाहिरात

स्मिता गोंदकरने दिली ग्रॅण्ड पार्टी! सेलिब्रिटींची फुल टू धमाल! पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या