JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Virgin Bhasskar-2 मुळे एकता कपूरने मागितली माफी, अहिल्याबाईंचे नाव वापरून भावना दुखावल्याचा आरोप

Virgin Bhasskar-2 मुळे एकता कपूरने मागितली माफी, अहिल्याबाईंचे नाव वापरून भावना दुखावल्याचा आरोप

व्हर्जिन भास्कर-2 (Virgin Bhaskar-2) या वेबसीरिजमध्ये ‘अहिल्याबाईं’चे नाव वापरल्यामुळे समाजभावना दुखावल्या गेल्याचा आरोप निर्माती एकता कपूरवर (Ekta Kapoor) करण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 सप्टेंबर : फिल्म आणि टीव्ही निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) एका वेबसीरिजमुळे पु्न्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. व्हर्जिन भास्कर-2 (Virgin Bhasskar-2) या वेबसीरिजमध्ये ‘अहिल्याबाईं’चे नाव वापरल्यामुळे समाजभावना दुखावल्या गेल्याचा आरोप एकता कपूरवर करण्यात आला आहे. त्याबाबत एकता कपूरने माफी मागितली आहे. एकताने असे म्हटले आहे की ‘मी त्या कार्यक्रमाशी असोसिएटेड नाही आहे आणि ते दृश्य हटवण्यात आले आहे.’ एकताने ALTBalaji च्या टीमच्या वतीने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये असे लिहिले आहे की, ‘हे नुकतेच माझ्या लक्षात आले आहे की ALTBalaji शो ‘व्हर्जिन भास्कर 2’ मध्ये एक दृश्य आहे ज्यामध्ये ‘अहिल्याबाई’ नावाच्या वसतिगृहाचे चित्रण करण्यात आले आहे, ज्याने समाजातील एका विशिष्ट वर्गाला नाराज केले आहे. ज्या दृश्याकडे लक्ष वेधले जात आहे त्यातून कोणताही अनादर करायचा नव्हता. फक्त पहिले नावाचा वापर वसतिगृहाच्या नावासाठी केला आहे, ज्यामध्ये आडनावाचा उल्लेख नाही. " (हे वाचा- तेलुगू सुपरस्टारच्या मुलीने अशी म्हटली मराठी आरती, VIDEO व्हायरल) ती पुढे म्हणाली, “तरीसुद्धा, हे दृश्य शोच्या सर्जनशील दिग्दर्शकांनी तातडीने काढून टाकले आहे. जे नाव वापरले आहे, ते कोणत्याही व्यक्तीचा अनादर करण्याकडे इशारा करत नाही.’

तिने पुढे असेही लिहिले आहे की प्रोजेक्टशी संबंधित नसतानाही तिने माफी मागितली आहे. , “याची नोंद व्हावी याकरता, मी या मालिकेमध्ये सामील नाही आहे किंवा मी या शोची क्रिएटिव्ह देखरेख देखील करत नाही. तरी मी संपूर्ण टीमच्या वतीने नकळत भावना दुखावल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करू इच्छिते. आपल्या मराठा नेत्यांच्या समृद्ध वारशाबद्दल आम्हाला सर्वात जास्त आदर आहे’, असे तिने म्हटले आहे. (हे वाचा- अनन्याचा ‘Khaali Peeli’ पाहण्यासाठी प्रत्येक वेळी द्यावे लागणार पैसे, वाचा कारण) अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भूषणसिंग राजे होळकर यांनी सदर दृष्य हटविण्यात यावे आणि माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली होती. त्यानंतर एकताने हे स्टेटमेंट जारी केले आहे. AltBalajiच्या या शोमध्ये रुतपन्ना ऐश्वर्या आणि अनंत जोश प्रमुख भूमिकेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या