JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / यामी गौतमनंतर EDची दिनो मोरियाला दणका, अभिनेत्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप

यामी गौतमनंतर EDची दिनो मोरियाला दणका, अभिनेत्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप

ED Action on Bollywood actor: काल ईडीनं अभिनेत्री यामी गौतमला ही समन्स पाठवले. आता ईडीनं आणखी अभिनेत्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 जुलै: महाराष्ट्रात ईडीनं (Enforcement Directorate) अभिनेता दिनो मोरियाला (Dino Morea) दणका दिला आहे. मनी लॉड्रिंग (Money Laundering) प्रकरणी ईडीनं अभिनेता दिनो मोरियाची संपत्ती सील करण्यात आली. काल ईडीनं अभिनेत्री यामी गौतमला ही समन्स पाठवले. आता दिनो मोरियासह अभिनेता संजय खान आणि डिजे अकील यांची कोट्यवधींची संपत्ती सील केली आहे. स्टर्लिंग बायोटेक बँकेच्या फसवणूकीचा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. 14 हजार 500 कोटी रुपयांचे बँक घोटाळ्यातील आरोपी आणि गुजरातचे बिजनेसमन संदेसरा बंधु (Sandesara Group) यांच्यासोबत या तिघांचं कनेक्शन असल्याचं ईडीच्या तपासात उघड झालं. त्यानंतर ईडीनंही पावलं उचलण्यास सुरुवात केली.

संबंधित बातम्या

दिनो मोरिया हे दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांचा जावई आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळी अहमद पटेल बरेच सक्रिय होते. गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं. हेही वाचा-   लग्नानंतर यामी गौतमला EDचा दणका; आर्थिक गैरव्यहार प्रकरणी पाठवलं समन्स सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेसरा बंधुओसोबत अहमद पटेल यांचे चांगले संबंध होते अशी माहिती तपास करताना समोर आली होती. अहमद पटेल यांचा जावई इरफान सिद्दीकी याला संदेसरा बंधुंनी मोठ्या प्रमाणात रक्कम दिली आहे. इरफान नंतर आता ही कारवाई दिनोवर झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या