VIDEO: अभिनेत्री उर्मिला निंबाळकरला टेबलाखाली भेटली एक गोड, गोंडस व्यक्ती; पाहून प्रेमात पडाल
मुंबई, 01 जून: अभिनेत्री आणि युट्यूबर (Youtuber) इन्फ्लुएन्सर (Influencer) उर्मिला निंबाळकर (Urmila Nimbalkar) छोट्या पडद्यावर आपला चाहता वर्ग निर्माण करुन आता सोशल मीडियाच्या जगात एक यूट्यूबर म्हणून आपली नवी ओळख निर्माण करत आहे. ‘दुहेरी’ (Duheri) तसेच हिंदी टेलिव्हिजनवरील अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्मिलानं काम केलं आहे. उर्मिला काही महिन्यांपूर्वीच आई झाली आहे. सध्या ती बाळ आणि काम असं दोन्ही मॅनेज करताना दिसते. उर्मिला तिच्या यूट्यूब चॅनेलसाठीही प्रचंड मेहनत घेत असते. तसंच उर्मिला सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते. उर्मिलाला नुकतंच काम करत असताना टेबलाखाली एक फार गोंडस व्यक्ती भेटलीय. त्या व्यक्तीचा क्यूट व्हिडीओ उर्मिलानं तिच्या इन्स्टग्रामवर शेअर केला आहे. उर्मिलाने शेअर केलेल्या व्हिडीओमधील गोंडस व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून तिचा छोटा मुलगा अथांग (Athang) आहे. अभिनेत्री उर्मिलाला पुत्ररत्न प्राप्त झालं. मुलाचं नाव तिनं अथांग असं ठेवलं आहे. उर्मिला अथांगचे अनेक व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. अथांग आता 6 महिन्यांच्या झाला आहे त्यामुळे तो रांगत रांगत घरभर फिरत असतो. उर्मिला काम करत असताना असाच तो उर्मिलाच्या टेबलाखाली आला. तेव्हा ‘टेबलाखालून चांगल्या गोष्टीही मिळतात!’, असं क्यूट कॅप्शन देत अथांगचा क्यूट व्हिडीओ तिने शेअर केला आहे.
उर्मिला उत्तम अभिनेत्री आहेच तसेच ती सक्सेसफुल यूट्युबर, उत्तम मराठी काँटेंट क्रिएटर आहे. आणि त्याहून भारी म्हणजे ती अथांगची सुंदर, प्रेमळ आई देखील आहे. अथांगच्या जन्मापासूनच उर्मिला त्याच्या सगळ्या गोष्टी तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत आली आहे. हेही वाचा - Tujhech Mi Geet Gaat Ahe: मालिकेत नवा ट्विस्ट; अभिनेत्री उर्मिला कोठारेनं का घेतली मालिकेमधून एक्झिट? उर्मिला आणि तिचा नवरा सुकीर्त दोघेही त्यांच्या बाळाला फार उत्तमरित्या सांभाळत असतात. सुकीर्तही उर्मिलाला सगळ्या गोष्टीत सपोर्ट आणि मदत करत असतो. उर्मिलाने काही दिवसांपूर्वी सुकीर्तसाठी खास पोस्ट शेअर केली होती. ज्यात सुकीर्त अथांगला पोटाशी बांधून वॉकला घेऊन जाताना दिसत होता. एक नवरा, मित्र आणि आता बाबा म्हणून सुकीर्त सगळ्या जबाबदाऱ्या न लाजता पार पाडतो याच उर्मिलानं कौतुक केलं होतं. उर्मिला यूट्यूबर होण्याआधी अभिनेत्री होती. स्टार प्रवाहवरील ‘दुहेरी’ मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती. तसेच झी युवाच्या ‘बन मस्का’ मालिकेतही तिनं काम केलं आहे. ‘सनई चौघडे’ या मराठी सिनेमातही उर्मिला अभिनय केलाय. मराठी तसेच हिंदी टेलिव्हिजनवरील उर्मिला हा सर्वांच्या ओळखीचा चेहरा आहे.