JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Rohit Shetty: स्टंट करणं रोहित शेट्टीला पडलं महागात; शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत

Rohit Shetty: स्टंट करणं रोहित शेट्टीला पडलं महागात; शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत

स्टंट करणं रोहित शेट्टीला महागात पडलं आहे. एका शूटिंगदरम्यान रोहित शेट्टीचा अपघात झाला असून त्याला दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे.

जाहिरात

रोहित शेट्टी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 जानेवारी :  बॉलिवूडचा खिलाडी दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टी . त्याच्या चित्रपटात गाड्या एकमेकांवर आदळतात, तुटतात आणि नायक कधी त्यांच्या वर उभे राहतात तर कधी स्टंट करतात. चित्रपटाच्या लूकवरूनच आपण ओळखू शकता की हा चित्रपट रोहित शेट्टीने बनवला आहे. याशिवाय रोहित शेट्टी टीव्ही शो खतरों के खिलाडीमध्येही बरेच स्टंट करतो आणि खेळाडूंना ते करायला लावतो. मात्र आता हेच स्टंट करणं रोहित शेट्टीला महागात पडलं आहे. एका शूटिंगदरम्यान रोहित शेट्टीचा अपघात झाला असून त्याला दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या आगामी वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. रोहित त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या वेब सीरिजचे शूटिंग करत होता. ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सीरिजचे शूटिंग करताना हा अपघात घडला. मीडिया रिपोर्टनुसार कार चेससंदर्भातील शॉट शूट करताना रोहितच्या हाताला दुखापत झाली. हैदराबादमध्ये हे शूटिंग सुरू आहे. दरम्यान ही घटना घडताच त्याच्या टीमन लगेचच दिग्दर्शकला कामिनेनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांच्या टीमने रोहित्या हातावर किरकोळ शस्त्रक्रिया केली असून त्याला आजच डिस्चार्ज देण्यात आला. हेही वाचा - Prasad Oak: प्रसाद ओकच्या लग्नाला पूर्ण झाली 25 वर्ष; कशी सुरु झाली यांच्या ‘प्रेमाची गोष्ट’? कार चेस सिक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान रोहित शेट्टीच्या हाताला दुखापत झाली आहे. . त्यानंतर प्रॉडक्शन टीमने त्याला कामिनेनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांच्या पथकाने किरकोळ शस्त्रक्रिया केली असली आणि रोहित शेट्टीला त्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला.

संबंधित बातम्या

रोहितच्या सिनेमात कायम धमाकेदार ॲक्शन पाहायला मिळते. हिरो-व्हिलनमधील फाइल सीक्वेन्स, गाड्यांचे अपघात, एकमेकांवर गाड्या आपटणं या गोष्टी तर शेट्टीच्या सिनेमातील खूपच सामान्य बाबी आहेत. याशिवाय कार आपटून त्यांचा चक्काचूर होणं, गाड्यांच्या टपावर उभं राहून हिरोची एन्ट्री, हेलिकॉप्टरमधून उड्या मारणं असे खतरनाक स्टंटही रोहितच्या सिनेमात असतात. याशिवाय ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमातही रोहित स्पर्धकांकडून भयंकर स्टंट्स करून घेतो. अशाच एका सीनमध्ये कार चेसचा सीक्वेन्स शूट करताना हा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले.

रोहित शेट्टी चा सिनेमा म्हंटल कि ती सुपरहिट होणारच असं ठरलेलंच आहे. मात्र नुकताच आलेला त्याचा सर्कस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला आहे. पण  2022 हे वर्ष रोहित शेट्टीसाठी काही खास नसलं तरी 2023 मध्ये रोहित शेट्टी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट आणि वेब सिरीज घेऊन येणार आहे. ‘इंडियन पोलीस फोर्स’ हा रोहितचा ड्रीम प्रोजेक्ट असून हि भारतातील सर्वात महागडी आणि मोठी सिरीज असणार आहे. या वेबसिरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत असणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या