JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Terence Lewis: टेरेंस लुईसने नोराला केला होता चुकीच्या पद्धतीने स्पर्श? कोरिओग्राफरनं स्पष्टच सांगितलं

Terence Lewis: टेरेंस लुईसने नोराला केला होता चुकीच्या पद्धतीने स्पर्श? कोरिओग्राफरनं स्पष्टच सांगितलं

व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये, लोकांनी टेरेन्सवर नोराला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप केला. खरंच टेरेंसने नोराला चुकीच्या पद्घतीने स्पर्श केला होता का? आता बराच काळ लोटल्यानंतर टेरेंसने या सगळ्या प्रकरणावर मौन सोडलं आहे.

जाहिरात

टेरेंस लुईस- नोरा फतेही

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 ऑक्टोबर : अभिनेत्री नोरा फतेही व कोरियोग्राफर टेरेंस लुईस अनेकदा चर्चेत असतात. मध्यंतरी हे दोघे रिलेशशीपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर आता हे दोघे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले. नोरा आणि टेरेन्स हे दोघे ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या कार्यक्रमाचं परीक्षण करतात. या शोच्या सेटवरील दोघांचा एक व्हिडीओ समोर आला होता.  त्या व्हिडिओमध्ये टेरेन्स नोराला चुकीच्या ठिकाणी स्पर्श करत असल्याचे दिसत होते. टेरेन्स आणि नोरा यांच्यातील व्हायरल व्हिडिओनंतर टेरेन्सला खूप ट्रोल करण्यात आले. यावर आता कोरिओग्राफर टेरेन्स लुईसने प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी  ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या रिअॅलिटी शोमध्ये घडली होती. शोमध्ये टेरेन्स लुईस जज म्हणून होते आणि नोरा फतेही त्या एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून आली होती. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये, लोकांनी टेरेन्सवर नोराला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप केला, तर इतरांचा असा विश्वास होता की त्यांच्यात काहीतरी आहे. खरंच टेरेंसने नोराला चुकीच्या पद्घतीने स्पर्श केला होता का? यावर दोघांनीही आजवर न बोलणंच पसंत केलं. पण आता बराच काळ लोटल्यानंतर टेरेंसने या सगळ्या प्रकरणावर मौन सोडलं आहे. हेही वाचा - Urvashi Rautela: ऋषभ पंत नव्हे तर ‘हा’ आहे उर्वशीच्या आयुष्यातील खरा ‘मिस्टर आरपी’ मनिष पॉलच्या ‘पॉडकास्ट’ कार्यक्रमादरम्यान टेरेंसने या प्रकरणाबाबत खुलासा केला आहे. तो म्हणाला, “शोमध्ये अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या पत्नी आल्या होत्या. आपण त्यांचं स्वागत चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे असं गीता कपूरला वाटलं. या भागादरम्यान शोची परीक्षक मलायका अरोराला करोनाची लागण झाली होती. म्हणूनच मलायकाच्या जागी नोरा फतेही हा शो जज करत होती.”

तो पुढे म्हणाला कि, “गीताने सांगितल्याप्रमाणे आम्ही शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या पत्नीचं स्वागत केलं. पण यादरम्यान नोराला माझा स्पर्श झाला असल्याचं मला आठवतही नाही. मी का कोणाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या आजूबाजूला कॅमेरा असताना मी असं का करेन? या प्रकरणानंत मला मॅसेजद्वारे शिवीगाळ करण्यात आली. मी नोराबरोबर शोमध्ये डान्सही केला होता.” पुढे तो म्हणाला, “डान्स करत असताना आपण एका वेगळ्याच दुनियेमध्ये असतो. त्यावेळी तुम्हाला दुसरं काही सुचतही नाही. अशाप्रकारचं कृत्य करायला हिंमत लागते.” तसाच  टेरेन्सने हा व्हिडिओ मॉर्फ केलेला असल्याचे सांगत स्वतःचा बचाव केला. तो म्हणाले, ‘इफेक्ट्सचा वापर इतका स्पष्टपणे दिसत होता, की तो कोणालाही सहज पाहता येईल. आजच्या काळात प्रत्येक सेलिब्रिटीवर मीम्स बनवले जातात. ही एक खोडकर गोष्ट होती आणि मला त्याची पर्वा नव्हती.’ या वर्षी त्याने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत नोरा फतेहीसोबतच्या त्याच्या नात्याच्या अफवा दूर केल्या आणि म्हणाला, ‘आम्ही खूप चांगले मित्र आहोत.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या