JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आठवलेंच्या ‘कोरोना गो’ नंतर ढिंचॅक पूजा... नव्या गाण्याचा VIDEO होतोय व्हायरल

आठवलेंच्या ‘कोरोना गो’ नंतर ढिंचॅक पूजा... नव्या गाण्याचा VIDEO होतोय व्हायरल

आता बिग बॉसची 11 ची स्पर्धक आणि सोशल मीडिया सेन्सेशन ढिंचॅक पूजानंही Coronavirus वर एक गाणं तयार केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 मार्च : सध्या कोरोना व्हायरसनं सगळीकडे थैमान घातलं आहे. ज्याचा परिणाम कधी नव्हे ते आता मनोरंजन विश्वावरही झालेला पाहायला मिळत आहे. अशात या कोरोना व्हायरसवर अनेक गाणी बनवली गेली आहेत. या सगळ्याची सुरुवात आठवलेंच्या गो कोरोना पासून झाली आणि आता बिग बॉसची 11 ची स्पर्धक आणि सोशल मीडिया सेन्सेशन ढिंचॅक पूजानंही Coronavirus वर एक गाणं तयार केलं आहे. दिलो का शूटर है मेरा स्कूटर या गाण्यामुळे सोशल मीडियावरुन रातोरात स्टार झालेल्या पूजा जैन म्हणजेच ढिंचॅक पूजानं कोरोना व्हायरसवर होगा ना करोना हे नवं गाणं तयार केलं आहे. हे गाणं 19 मार्चला पूजाच्या ऑफिशिअल युट्यूब पेजवर अपलोड करण्यात आलं. या गाण्याच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर सुद्धा देण्यात आला आहे. ज्यात हे गाणं केवळ जनजागृतीच्या हेतूनं तयार करण्यात आल्याचं म्हटलं गेलं आहे. रणबीर कपूर आणि आलिया भटचं Breakup? काय आहे या दोघांच्या नात्याचं सत्य कोरोना व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत लाखो लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे सर्वांनाच योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. सर्दी तापाची लक्षणं दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. आवश्यक त्या चाचण्या करून घ्या, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका असं सांगितलं जात आहे. त्यामुळे सर्वच बॉलिवूड कलाकार शूटिंग थांबवून घरी थांबले आहेत. VIDEO : Coronavirus मुळे सेलिब्रेटी बसलेत घरी, सलमान-कतरिनानं केलं ‘हे’ काम SHOKING! अभिनेत्री जसलीन मथारू आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या