बागबान
मुंबई, 13 जुलै : हेमा मालिनी यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. ‘बागबान’ हा त्यापैकीच एक आहे. या चित्रपटात हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांची जोडी दिसली होती. 2003 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात हेमा आणि अमिताभ यांनी आई-वडीलांची भूमिका साकारली होती. ज्यात ते मुलांसोबत जगण्यासाठी संघर्ष करताना दिसले होते. हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांना या चित्रपटानं पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र आणलं होतं. दोघांच्या जोडीचंही खूप कौतुक झालं होतं. हा ब्लॉकबस्टर चित्रपट आजही प्रेक्षकांना खूप भावूक करतो. पण तुम्हाला माहितीये का की एवढा हिट चित्रपट असून धर्मेंद्रने हा चित्रपट पाहण्यास नकार दिला होता असं म्हटलं जातं. आता या अफवेवर हेमा मालिनी यांनी एवढ्या वर्षांनंतर प्रतिक्रिया दिली आहे. ‘बागवान’ मध्ये हेमा आणि अमिताभ यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. दोघे रोमान्स करताना देखील दिसले होते. या दोघांमुळेच हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. पण तेव्हाच हेमा आणि अमिताभ यांच्या केमिस्ट्रीमुळे धर्मेंद्र यांना हा चित्रपट कधीच पाहायचा नव्हता, अशी अफवा पसरली होती. धर्मेंद्रने हा चित्रपट पाहण्यास नकार दिला होता असं म्हटलं जायचं. आता एवढ्या वर्षानंतर या अफवेवर हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लेहरेन रेट्रोशी संवाद साधताना हेमा यांना याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्या हसायला लागल्या. त्या म्हणाल्या की, ‘मला याबद्दल माहिती नाही. मला त्याबद्दल काहीच माहिती नाही.’ पहिल्यांदाच असं काही ऐकल्यानंतर हेमाला याना हसूच आवरलं नाही. या चित्रपटाबद्दल बोलताना त्यांनी ‘बागवान हा एक सुंदर चित्रपट असल्याचं म्हटलं आहे. ‘त्याला माझ्यासोबत रात्र घालवायची होती…’ कास्टिंग काऊच बद्दल प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा हा चित्रपट साईन करण्या वेळचा किस्सा सांगत हेमा मालिनी म्हणाल्या, ‘मला आठवते की मी रवी चोप्राकडून कथा ऐकत असताना माझी आई तिथे बसली होती. ते गेल्यावर मी तिला म्हणाले, एवढ्या मोठ्या मुलांच्या आईची भूमिका साकारण्यासाठी विचारलं आहे. मी हे कसे करू शकते? पण आई म्हणाली, नाही, नाही तुला हा चित्रपट करायचा आहे. मी त्याचं कारण विचारताच ती म्हणाली, कथा खूप चांगली आहे. तुला या चित्रपटात काम करावंच लागेल. ती माझ्या मागे लागली होती.’ असं त्या म्हणाल्या. याबाबत पुढे हेमा म्हणाल्या की, ‘आईच्या आग्रहामुळे मी चित्रपटाला होकार द्यायचं ठरवलं. पण तेव्हा मी चित्रपटसृष्टीपासून खूप दिवस दूर होते. आणि कमबॅक साठी मी चांगली भूमिका शोधत होते. पण बागबान मधील या भूमिकेतून कमबॅक करावं असं मला वाटत नव्हतं. पण आईने मला समजावलं आणि ही भूमिका चांगली असून ती तू करायला पाहिजे असं ती म्हणाली. त्यामुळेच मी हा चित्रपट केला.’ असा खुलासा हेमा मालिनी यांनी केला आहे.