JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉलिवूडचं क्यूट कपल साकरतंय कपिल देव यांची लव्हस्टोरी, दीपिकानं शेअर केला '83' मधील First Look

बॉलिवूडचं क्यूट कपल साकरतंय कपिल देव यांची लव्हस्टोरी, दीपिकानं शेअर केला '83' मधील First Look

सिनेमा ‘83’ मध्ये रणवीर सिंह माजी क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका तर दीपिका पदुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 फेब्रुवारी : कबीर खानच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला सिनेमा ‘83’ अभिनेता रणवीर सिंह माजी क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर दीपिका पदुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे. ‘83’ सिनेमाच्या निमित्तानं रणवीर आणि दीपिका चौथ्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. सुरूवातीला दीपिकानं या सिनेमाला नकार दिला होता पण नंतर मात्र दीपिकानं ती या सिनेमामध्ये रोमी भाटियांची भूमिका साकारत असल्याचं स्पष्ट केलं केलं होतं. त्यानंतर आता दीपिकानं या सिनेमातील तिचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. दीपिकानं तिच्या इन्स्टाग्रामवर रोमी भाटिया यांच्या भूमिकेतील तिचा फोटो शेअर केला. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘क्रीडा क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण मानल्या जाणाऱ्या ‘83’ सिनेमात एक लहानशी भूमिका साकारायला मिळणं हा खरं तर माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. एका यशस्वी पुरूष्या व्यावसायिक आणि व्यक्तीगत आयुष्यात त्यांच्या पत्नीची किती मोठा वाटा असतो हे मी माझ्या आईमध्ये पाहिलं आहे आणि 83 मधील ही भूमिका आपल्या पतीच्या स्वप्नासाठी झटणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या मनातली भावना आहे.’ परिस्थिती भीतीदायक असतानाही लेकीला खळखळून हसवतोय बाप, मन हेलावणारा VIDEO

या अगोदर 83 सिनेमातील सर्व कलाकरांचे फर्स्ट लुक समोर आले होते. पण दीपिका या सिनेमात रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारत असल्यानं तिच्या फर्स्ट लुकविषयी सर्वांना उत्सुकता होती. या फोटोमध्ये दीपिका शॉर्ट हेअर फुलनेक ब्लॅक टीशर्टमध्ये दिसत असून तिनं रणवीरचा हात पकडला आहे. 1983 मधील भारतीय क्रिकेट संघानं साकारलेल्या ऐतिहासिक विजयावर आधारित असलेला ‘83’ हा सिनेमा 10 एप्रिल 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमर सिंह यांची मृत्यूशी झुंज, अंथरुणाला खिळलेले असताना मागितली अमिताभ यांची माफी

जाहिरात

दीपिकाला एवढ्या चांगल्या भूमिका ऑफर होत असताना तिनं एवढी छोटीशी भूमिका साकारण्यासाठी का तयार झाली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार दीपिकानं हा सिनेमा दोन कारणांसाठी साइन केला आहे. पहिलं कारण रणवीर आहे आणि दुसरं कारण म्हणजे या सिनेमासाठी दीपिकाला मोठी रक्कम मानधन मिळत आहे.

जाहिरात

‘83’ सिनेमाच्या संबंधीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिका या सिनेमाविषयी दोन बाजूनी विचार करत होती. सहाय्यक भूमिका करावी की नाही याबद्दल तिला शंका होती. पण अखेर तिनं हा सिनेमा स्वीकारला. यामागे कदाचित रणवीर किंवा तिला या सिनेमासाठी मिळत असलेलं मानधन असण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दीपिकानं या सिनेमात रोमी भाटिया यांची भूमिका साकारण्यासाठी तब्बल 14 कोटींचं मानधन घेतलं आहे. सिद्धार्थबद्दल वक्तव्य करणं शिल्पाच्या अंगलट, फॅन्स शिल्पावर भडकले

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या