JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : असं आहे दीपिका-रणवीरचं 119 कोटीचं मुंबईतलं घर, समोर आली पहिली झलक

VIDEO : असं आहे दीपिका-रणवीरचं 119 कोटीचं मुंबईतलं घर, समोर आली पहिली झलक

आता दीपिका आणि रणवीर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांचे नवीन 119 कोटीच्या घराचा पहिला वहिला एक व्हिडिओ समोर आला आहे.

जाहिरात

असं आहे दीपिका-रणवीरचं 119 कोटीचं मुंबईतलं घर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जून - बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडी म्हणून रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्याकडे पाहिले जाते. या दोन्ही सेलिब्रेटींचा चाहतावर्ग मोठा आहे. दीपिकाला तर सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स आहे. आता दीपिका आणि रणवीर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांचे नवीन 119 कोटीच्या घराचा पहिला वहिला एक व्हिडिओ समोर आला आहे. रणवीर सिंग आणि दीपिकाची हे नवीन घर वांद्र्यात आहे, शिवाय त्यांचे हे ड्रीम होम शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्याजवळ आहे. त्यांच्या या ड्रीम होमची किंमत अंदाजे 119 कोटी रुपये इतकी आहे. विरल भयानी’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दीपिका-रणवीरच्या ‘ड्रीम हाऊस’चा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका-रणवीरचे ‘ड्रीम हाऊस’ तुम्ही पाहू शकता. सध्या या अलिशान घरामध्ये दीपिका आणि रणवीर राहत नसून इमारतीचे अद्याप काम सुरू आहे. वाचा- साखरपुड्याच्या 7 वर्षांनी लग्न, 2 वर्षांत हलला पाळणा, TV अभिनेत्री बनवी आई एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंह आणि त्याचे वडिल जुगजीत भवनानी यांच्या ओह फाईव्ह ओह मीडिया वर्क एलएलपी कंपनीने 8 जुलै रोजी वांद्रा बॅन्डस्टँड येथील सागर रेशम इमारतीमध्ये 16, 17, 18 आणि 19 असे चार मजले विकत घेतले आहेत. याची किंमत अंदाजे 119 कोटी आहे. या घराची स्टॅम्प ड्युटीच 7.13 कोटी इतकी भरण्यात आली आहे. यामध्ये रणवीरला 11,266 sq. ft इतका कारपेट एरियासह 1300 स्क्वेअरफूटचे टेरिस आणि 19 कार पार्किंगच्या जागा असे डिल करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

सोशल मीडियावर सध्या दीपिका आणि रणवीरच्या घराची जोरदार चर्चा रंगलेली आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स आहेत, जे आपल्या लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या कारमुळे तर कधी त्यांच्या कपड्यामुळे सतत चर्चेत असतात.

दोघांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर रणवीरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर व आलिया भट्टची जोडी पाहायला मिळणार आहे. तर दीपिका लवकरच ‘जवान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच तिचा ‘फायटर’ चित्रपट 2024 ला प्रदर्शित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या