JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / एक अभिनेत्री कशाप्रकारे राडा घालू शकते हे पाहाच, तुम्ही असं कधी केलं आहे का?

एक अभिनेत्री कशाप्रकारे राडा घालू शकते हे पाहाच, तुम्ही असं कधी केलं आहे का?

नुकताच अभिनेत्री दीक्षा केतकरनं एक भन्नाट फोटो विथ भन्नाट कॅप्शन शेअर केला आहे. सध्या तिचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 मे- सोनी मराठी वाहिनीवर ‘तू सौभाग्यवती’ या मालिकेतून अभिनेत्री दीक्षा केतकर ( deeksha ketkar )  महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. दीक्षा केतकर सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असते. ती नेहमीच तिचे काही फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिनं एक भन्नाट फोटो विथ भन्नाट कॅप्शन शेअर केला आहे. सध्या तिचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. सध्या सगळीकडे आंबा महोत्सवर म्हणा किंवा आंब्याचा सीझन सुरू आहे. जो तो कसा मस्त आंब्याचा ताव मारताना दिसत आहे. काही मालिकांच्या सेटवर देखील आंबा पार्टी, आमरस पार्टी रंगत आहेत. अशातच दीक्षा केतकरनं देखील तिचा एका आंबा ( mango ) खात असलेल्याचा फोटो इन्स्टाला पोस्ट केला आहे. सोबत तिनं म्हटलं आहे की, राडा….तिंन ज्याप्रमाणे आंबा खाल्ला आहे त्यानुसार या फोटोला राड ही कॅप्शन योग्यचं वाटत. अनेकजण आंबा म्हटलं की तुटून पडतात. अगदी दीक्षाच्या बाबतीत तसेच झालेले दिसत आहे. चाहत्यांनी देखील याव मजेशीर कमेंट केल्या आहेत. वाचा- केतकी चितळे प्रकरणात मोठी अपडेट, अभिनेत्रीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ दीक्षाची ‘तू सौभाग्यवती हो’ ही पहिलीच मालिका होती. पण या पहिल्याच मालिकेतील तिनं अभिनयाच्या जीवावर वेगळी ओळख बनवली. दीक्षाबरोबरच या मालिकेमध्ये हरीश दुधाडे, ज्योती चांदेकर, रोहित फाळके, गुरु दिवेकर आणि प्रिया करमरकर यासारखी मोठी स्टारकास्ट होती.दीक्षा केतकरने बालकलाकार म्हणून काही नाटकांमध्ये काम केलं आहे.

संबंधित बातम्या

या भूमिकांसाठी तिला पुरस्कारही मिळाले आहेत. तिने न्यूयॉर्कला जाऊन अभिनयाचे रितसर प्रशिक्षणही घेतले आहे. धूसर या मराठी सिनेमातही तिने काम केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या