मुंबई, २७ एप्रिल- बॉलिवूड अभिनेता आणि नताशा दलाल गेली अनेक वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. लहानपणीचे मित्र- मैत्रीणी आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. आतापर्यंत नताशा आणि वरुण दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल गुप्तपा बाळगली होती. पण आता दोघांनी आपल्या नात्याचा स्वीकार केला असून लवकरच लग्न करण्याचा विचार ते करत आहेत. बी- टाऊनमधील चर्चेनुसार, दोघांना यावर्षी डिसेंबरमध्येच लग्न करायचं होतं. तशा तयारीलाही दोघांनी सुरुवात केली होती. पण आता त्यांचं लग्न काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आलं आहे. गेली ३० वर्ष हा अभिनेता लढतोय एड्सची लढाई, कधीही होऊ शकतो मृत्यू याबद्दल बोलताना वरुणचे बाबा आणि दिग्दर्शक डेविड धवन म्हणाले की, वरुणचं लग्न पुढच्यावर्षी होईल. मेन्सएक्सपीला दिलेल्या मुलाखतीत डेविड म्हणाले की, ‘मी दोघांच्या निर्णयामुळे फार आनंदी आहे. एका बापाला याहून जास्त काय हवं असतं. सध्या वरुण त्याच्या वाढदिवसानिमित्त परदेशात सुट्टीसाठी गेला आहे. वरुणने व्हिडीओ कॉल करून आमच्यासोबत केक कापला. यावेळी आमच्यासोबत माझी नात नायराही होती.’ ‘एकदा तरी तिने मला कॉल करायचा होता…’ जेव्हा दीपिका पदुकोणने रणबीरला म्हटलं होतं विश्वासघाती, त्याने दिली होती ही प्रतिक्रिया दरम्यान, करण जोहरच्या चॅट शोमध्ये नताशाबद्दल बोलताना वरुण म्हणाला की, ‘मी तिच्यासोबत नेहमीच असतो. तिला स्वतःची अशी वेगळी ओळख आणि मत आहे. तिला जे करायचं असतं त्याबद्दल ती फार आग्रही असते यामुळेच तिच्या आयुष्यात यशही मिळालं आहे.’ आता सलमान खानशी भिडणार आलिया आणि रणबीर कपूर ‘तिचा साथिदार म्हणून मला तिच्या या गोष्टींना पाठिंबा द्यायला नक्कीच आवडेल. माझ्या करिअरच्या वाटचालीतही तिने मला नेहमीच पाठिंबा दिला. अगदी पहिल्या दिवसापासून ती माझ्या पाठिशी उभी होती.’ …म्हणून एवेंजर्स सिनेमा संपण्याच्याआधीच थिएटरमधून बाहेर पडले सुशांत सिंग राजपूत वरुणच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर नुकताच त्याचा करण जोहर निर्मित कलंक सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. यानंतर वरुण रेमो डिसुजाच्या स्ट्रीट डान्सर ३डीमध्ये दिसणार आहे.