JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कोणी घासली भांडी तर कोणी पुसली फरशी, Corornavirus नं अशी लावली सेलिब्रेटींची वाट

कोणी घासली भांडी तर कोणी पुसली फरशी, Corornavirus नं अशी लावली सेलिब्रेटींची वाट

एरवी सगळीकडे मेकअपमध्ये फिरणारे हे सेलिब्रेटी सध्या घरी अगदी भांडी घासण्यापासून ते फरशी पुसण्यापर्यंत सर्व काम करताना दिसत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 मार्च : चीनच्या वुहान शहरापासून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं सर्वांचच जगणं मुश्किल करुन ठेवलं आहे. अनेक हॉलिवूड सेलिब्रेटींना या विषाणूची लागण झाली आहे. भारतातही हा विषाणू वेगानं पसरत असून सध्या देशात 450 पेक्षा जास्त लोक या विषाणूनं बाधित आहेत. संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री कोरोना व्हायरसमुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे सध्या सर्व सेलिब्रेटी स्वतःच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. या सगळ्यात भर म्हणजे या सेलिब्रेटींच्या घरी काम करणाऱ्या मेड सुट्टीवर असल्यानं त्यांच्या स्वतःची काम स्वतः करावी लागत आहेत. एरवी सगळीकडे मेकअपमध्ये फिरणारे हे सेलिब्रेटी सध्या घरी अगदी भांडी घासण्यापासून ते फरशी पुसण्यापर्यंत सर्व काम करताना दिसत आहेत. अभिनेत्री कतरिना कैफनं तिच्या इन्स्टाग्रामवर भांडी घालतानाचा एक व्हिडीओ शेअर केला. जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर अर्जुन कपूरनं केलेली कमेंट सुद्धा खूप चर्चेत आली होती. या व्हिडीओ कमेंट करताना अर्जुननं तिला कांताबेन 2.0 असं म्हटलं होतं. श्रुती हसनच्या घरात पडली फूट? वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत कुटुंबीय

याशिवाय अभिनेता कार्तिक आर्यन सुद्धा किचनमध्ये भांडी घासताना दिसला होता. कार्तिकच्या बहीणीनं त्याचा हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम शेअर केला होता. जो कार्तिनं रिपोस्ट करत त्याला कहानी घर घर की असं मजेदार कॅप्शन दिलं आहे. कार्तिकच्या हाताला फ्रॅक्चर असतानाही तो घरी काम करताना दिसत आहे. हेमा मालिनीकडे दिग्दर्शकानं केली होती बिकिनी सीनची मागणी आणि…

टीव्ही अभिनेत्री हिना खानचाही एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती खाली बसून घरातील फरशी पुसताना दिसत आहे. हिनानं तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना हिनानं #NoOneInNoOneOut असा हॅशटॅग वापरला आहे.

जाहिरात
जाहिरात

सध्या अनेक सेलिब्रेटी घरी राहून आपल्या कुटुंबीयांना वेळ देताना दिसत आहेत. काहीजण त्यांच्या कुटुंबीयाच्या आवडीचे पदार्थ बनवून खायला घालत आहेततर काही जण त्यांचे छंद जोपासायचा प्रयत्न करत आहेत. वाह! संकटकाळी व्हिलनच ठरला ‘हिरो’, केलं असं काही की सर्वांना वाटेल अभिमान

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या