JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / पुन्हा एकदा डॉ. मशहूर गुलाटीची धमाल! कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हर दिसणार एकत्र

पुन्हा एकदा डॉ. मशहूर गुलाटीची धमाल! कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हर दिसणार एकत्र

फॅन्सना पुन्हा एकदा कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हरला एकत्र पाहता येणार आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus)च्या संक्रमणामुळे अनेक कार्यक्रमांचं आणि मालिकांचं शूटिंग खोळंबले आहे. त्यामुळे जुने चॅनेलला जुने शो प्रसारीत करावे लागत आहेत.

जाहिरात

कपिल आणि सुनील यांनी कॉमेडी नाइटस् मधून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. सुनील ग्रोवरनं साकारलेलं गुत्थीचं विनोदी स्त्री पात्र गाजलं होतं. पण कपिल आणि सुनीलमध्ये मतभेद झाल्यानं सुनील बाहेर पडला. त्यानंतर त्यानं सुरू केलेल्या शोला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 एप्रिल : छोट्या पडदा गाजवणारा अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्माच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. कपिल शर्मा आणि अभिनेता-कॉमेडियन सुनील ग्रोव्हर यांच्यामधील वाद सर्वश्रृत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कपिल सुनिलशिवायचं शो करत आहे. पण त्या दोघांच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. फॅन्सना पुन्हा एकदा कपिल आणि सुनिलला एकत्र पाहता येणार आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus)च्या संक्रमणामुळे अनेक कार्यक्रमांचं आणि मालिकांचं शूटिंग खोळंबले आहे. त्यामुळे या कार्यक्रमांना त्यांचे जुने एपिसोड्स प्रसारीत करणं भाग आहे. (हे वाचा- PM Care Fund नाही तर या संस्थांना केली सैफ अली खान आणि करीना कपूरने मदत) त्यामुळे कपिल शर्माच्या कार्यक्रमाचे शूटिंग देखील थांबलं आहे. अशावेळी चॅनेलकडून जुने शो प्रसारीत करण्यात येत आहेत. ज्यामध्ये कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हर एकत्र काम करताना दिसत आहेत. या दोघांमधील वादामुळे त्यांनी एकत्र काम करणं बंद केले होते. पण कपिलच्या कार्यक्रमामध्ये सुनिलची कमतरता सर्वांनाच भासत होती. पण कोरोनामुळे पुन्हा एकदा या दोन्ही अवलियांना एकत्र काम करताना पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. अनेकांना लॉकडाऊनमध्ये घरी बसून कंटाळा आला असेल, तर काही क्षण हसवण्याचे काम हे दोन्ही कलाकार नक्कीच करतील. (हे वाचा- शक्तिमान’मधील कलाकार आता ओळखताही येत नाही, पाहा कसा दिसतो गंगाधर ) गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही कलाकार मीडियासमोर तसे एकत्र आलेले दिसत नाहीत. मात्र काही इव्हेंटदरम्यान दोघांना एकत्र पाहण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये निर्माण झालेला दुरावा कमी होत असल्याच्या चर्चाही आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या