JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्न! प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नवी मालिका सज्ज, पाहा VIDEO

छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्न! प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नवी मालिका सज्ज, पाहा VIDEO

प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आणखी एक मराठी मालिका सज्ज झाली आहे. सध्या सोशल मीडियावर या नव्या मालिकेची जोरदार चर्चा पहायला मिळत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जुलै : आपण गेल्या अनेक दिवसांपासून मराठी मालिकांची लोकप्रियता वाढत चालल्याचं बघतोय. मराठी मालिका टीआरपीच्या यादीतही चांगलीच स्पर्धा करताना पहायला मिळतात. त्यामुळे मराठी मालिकांचा प्रेक्षक वर्ग वाढत चालल्याचा दिसत आहे. वेगवेगळ्या धाटणीचे विषय हाताळत अनेक मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत असतात. त्यापैकी काही प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खऱ्या उतरतात तर काही म्हणाव्या अशा चालत नाहीत. अशातच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आणखी एक मराठी मालिका सज्ज झाली आहे. सध्या सोशल मीडियावर या नव्या मालिकेची जोरदार चर्चा पहायला मिळत आहे. ‘सोनी मराठी’ वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचं नाव ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्न’ (Chotya bayochi motthi swapna serial) असं असणार आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी द्यायला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून प्रोमोवर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद पहायला मिळतोय. इवल्या डोळ्यांना मोठ्या स्वप्नांची ओढ, बयोच्या ध्यासाला पुस्तकांची जोड! अशा आशयाच्या कॅप्शनसह मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधत आहे. हेही वाचा -  Darlings Trailer Release: आलिया भट्टची पहिली वहिली निर्मिती असलेल्या ‘डार्लिंग्स’चा खतरनाक ट्रेलर रिलीज मालिकेच्या प्रोमोतून पहायला मिळतंय की, छोट्याशा बयोला अभ्यास करायला खूप आवडतोय. कोणतंही काम करत असली तरी पुस्तक मात्र तिच्या सोबतच आहे. त्यामुळे एवढ्या छोट्याशा वयात छोट्या बयोला अभ्यास करुन खूप मोठं होण्याची स्वप्न आहेत पहायला मिळतंय. त्यामुळे मोठ्यांपासून लहाण्यांनाही या मालिकेची भुरळ पडणार असल्याचं दिसून येतंय.

संबंधित बातम्या

‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्न’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. मात्र अद्याप याची तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता किती लांबणीवर जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या