JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरचं दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण; 'मासा'चं MIFFमध्ये सिलेक्शन

नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरचं दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण; 'मासा'चं MIFFमध्ये सिलेक्शन

अनेक मराठी सिनेमांमध्ये नृत्यदिग्दर्शन करणारी सर्वांची लाडकी नृत्यदिग्दर्शिका ‘फुलावा खामकर’ (choreographer phulawa khamkar) हिने ‘मासा’ (Maasa) या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तिच्या शॉर्टफिल्मची दखल ‘मिफ्फ’ने (MIFF) घेतली आहे.

जाहिरात

नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरचं दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण; 'मासा'चं MIFFमध्ये सिलेक्शन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 मे: ‘वाजले की बारा’ (Vajle ki bara) असो किंवा ‘अप्सरा आली’ (Apsara Ali)  मराठीतील अनेक सिनेमांमध्ये नृत्यदिग्दर्शन करणारी सर्वांची लाडकी नृत्यदिग्दर्शिका म्हणजे फुलवा खामकर (choreographer phulawa khamkar )  फुलवा उत्तम कथ्थक डान्सर आहेच मात्र त्याचप्रमाणे ती कंटेम्प्ररी तसेच जिमनॅस्टिक मास्टर देखील आहे.  गेली अनेक वर्ष नृत्य क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर फुलवा खामकर दिग्दर्शन क्षेत्राकडे वळली आहे. ‘मासा’ (Maasa Short Film) या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून फुलवा दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुलवाच्या पहिल्याच दिग्दर्शनाची दखल  ‘मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हनं’ (Mumbai International Film Festival MIFF))  घेतली आहे. येत्या 3 जूनला ही शॉर्टफिल्म ‘मिफ्फ’मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.   तब्बल 1300 सिनेमांमधून 120 सिनेमांची निवड करण्यात आली ज्यात फुलवाच्या ‘मासा’ या शॉर्टफिल्मचा देखील सहभाग आहे. फुलवा खामकर दिग्दर्शित ‘मासा’ या शॉर्टफिल्ममध्ये अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash) ज्योती सुभाष (Jyoti Subhash) हे मुख्य भूमिकेत आहेत. तर अभिनेता लेखक संदेश कुलकर्णी (Sandesh Kulkarni) याने शॉर्टफिल्मचं लिखाण केलं आहे. तर प्रसिद्ध संगीतकार निलेश मोहरीरनं (Nilesh Mohrir) फिल्मसाठी संगीत दिलं आहे.    ऐन तारुण्यात आपल्या पतीचं निधन झालेली केतकी आणि तिची वृद्ध सासू रखमा या दोघींची भावस्पर्शी कथा या शॉर्टफिल्ममध्ये दाखवण्यात आली आहे. अमृता आणि ज्योती सुभाष यांच्यासोबतच या शॉर्टफिल्ममध्ये अभिनेता संदेश कुलकर्णी, वज्र पवार आणि नयन जाधव हे कलाकारही आहेत.

मासा या पहिल्या वहिल्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून दिग्दर्शिका म्हणून समोर येत असल्याचा फुलवाला फार खुश आहे. मिफ्फला फिल्मचं सिलेक्शन झाल्यानंतर फिल्मच्या संपूर्ण टीमनं एकत्र येत सेलिब्रेशन केलं होतं. सेलिब्रेशनचा व्हिडीओ देखील फुलवानं तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केला होता.

मुंबई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मासा या शॉर्ट फिल्मविषयी फुलवा खामकरनं म्हटलं आहे की, ‘मासा या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून एक वेगळा दृष्टीकोन स्वीकारण्याची गरज आहे हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. एका गाण्याचं नृत्यदिग्दर्शन आणि शॉर्टफिल्मचं दिग्दर्शन हे काहीसं सारखं असलं तरी त्यात अनेक लहान लहान फरक आहेत.  दिग्दर्शन केल्याने एक विस्तृत दृष्टीकोन मिळाला आणि कथा सांगण्याची विशिष्ट शैली मला आत्मसात करता आली. हे सगळं श्रेय मासाच्या संपूर्ण टीमचं असल्याचं फुलवा म्हणाली’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या