मुंबई 26 जुलै: झी मराठीवरील धमाल कॉमेडी कार्यक्रम चला हवा येऊ द्या गेल्या सात वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. वर्षागणिक या कार्यक्रमाची लोकप्रियता अधिकाधिक वाढताना दिसत आहे. तब्बल आठ वर्षानंतर आज हवा येऊ द्या च्या टीमसाठी एक स्पेशल दिवस असल्याचं समोर येत आहे. श्रेया बुगडे या अभिनेत्रीने यासंदर्भात एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना थुकरटवाडी टीमबद्दलची ही गुड न्यूज शेअर केली आहे. तब्बल आठ वर्षांनी चला हवा येऊ द्या टीमचा एका नव्या वास्तूत श्री गणेशा होताना दिसणार आहे. या निमित्ताने सगळी टीम आज एकत्र आली असून त्यांनी गणपती बाप्पाचं नाव घेत शूटिंगला नव्या वास्तूमध्ये सुरुवात केल्याचं श्रेयाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये दिसून येत आहे. श्रेया या पोस्टमध्ये असं म्हणते, “तब्बल ८ वर्षांनी ,नव्या वास्तूत आजपासून थुक्रटवाडी चा श्री गणेशा!!! तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असू द्या नेहेमीप्रमाणे” हवा येऊ द्या कार्यक्रमाची टीम कायमच धमाल आणताना दिसत असते. मालिकेतील कलाकार एकाहून एक सरस विनोदाची बॅटिंग करून दर एपिसोडमध्ये कहर करताना दिसत असतात. गेल्या अनेक वर्षात सगळ्याच कलाकारांची भट्टी एकदम छान जमली असून त्यांच्यात ऑन आणि ऑफ स्क्रीन बरीच धमाल सुरु असते. हे ही वाचा- Hruta Durgule: 26 जुलै हृता-प्रतीकसाठी आहे सुपर स्पेशल; कपलचा रोमँटिक VIDEO आला समोर डॉ. निलेश, श्रेया, भाऊ, कुशल, भारत, सागर आणि नव्याने या चमूमध्ये जॉईन झालेले अनेक कलाकार मिळून हास्याचे स्फोट घडवत असतात. या टीमचा हा श्री गणेशा त्यांना अनेकानेक उंचीवर नेऊ दे अशी प्रतिक्रिया सध्या समोर येताना दिसत आहे. ही टीम नव्या उभारलेल्या सेटवर आता काय धमाल घेऊन येते याची उत्सुकता लागून राहिली आहे.
हवा येऊ द्या च्या येणाऱ्या भागात टाईमपास सिनेमाची टीम भेटीला येणार असून यावेळी एक दमदार स्किट सुद्धा बघायला मिळणार आहे. गेली अनेक वर्ष ही टीम वेगवेगळ्या सिनेमांना ट्विस्ट देऊन एक हटके व्हर्जन आलेल्या पाहुण्यांना दाखवत असते. येणाऱ्या भागच नवा प्रोमो सुद्धा सध्या बराच पसंत केला जात आहे.