JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'हम कुत्तों से बात नहीं करते..' सेलिब्रिटी कपलचं भन्नाट रील्स आणि सनसनाटी डायलॉगबाजी पाहिली का?

'हम कुत्तों से बात नहीं करते..' सेलिब्रिटी कपलचं भन्नाट रील्स आणि सनसनाटी डायलॉगबाजी पाहिली का?

नुकतंच श्रुतीने नवरा अभिनेता गौरव घाटणेकर (gaurav ghatnekar) सोबतचा एक मजेशीर रील्स शेअर केलं आहे. सध्या या सेलेब्रिटी कपलचं ( celebrity couple) रील्स (insta reel ) सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 एप्रिल- अभिनेत्री श्रुती मराठे **( shruti marathe )**ही सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. तिच्या विविध फोटोशूटनं ती नेहमीच चाहत्यांचे लक्षवेधून घेत असते. याशिवाय ती काही भन्नाट रील्स देखील शेअर करत असते.नुकतंच श्रुतीने नवरा अभिनेता गौरव घाटणेकर (gaurav ghatnekar) सोबतचा एक मजेशीर रील्स शेअर केलं आहे. सध्या या सेलेब्रिटी कपलचं ( celebrity couple) रील्स  (insta reel ) सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यावर चाहत्यांसह सेलब्सच्या देखील कमेंट येत आहेत. श्रुती मराठेने तिच्या नवऱ्यासोबत भन्नाट रील्स इन्स्टावर शेअर केलं आहे. एका हिंदी सिनेमातील डायलॉगवर आधारित हे रील्स आहे. यामध्ये या सेलेब्रिटी कपलचा कॉमेडी अंदाज हासायला भाग पाडतो. मरते दम तक या हिंदी सिनेमाती अभिनेते राजकुमार यांच्या हम कुत्तों से बात नहीं करते..या लोकप्रिय डायलॉरवर आधारिता हे रील्स आहे.या रील्सवर चाहत्यांसह सेलेब्सकडून कमेंट व लाईक्सचा वर्षाव होत आहे. वाचा- हद्दच! उर्फी जावेदने घातला चक्क म्हातारीच्या केसांपासून बनवलेला ड्रेस, VIDEO श्रुती आणि गौरनं 4 डिसेंबर 2016ला लग्नाच्या बंधनात अडकले. श्रुती आणि गौरवची ओळख ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमाच्या सेटवर दोघांना प्रेम झालं. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. गौरव घाटणेकर छोट्या पडद्यावरील ‘तुज विन सख्या रे’ या मालिकेतून गौरव घराघरांत पोहोचला होता.

संबंधित बातम्या

.श्रुती मराठेने 2009 मध्ये आलेल्या ‘सनई चौघडे’ सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं. तर इंदिरा विजहा या सिनेमातून तिने साऊथमध्ये एंट्री घेतली. श्रुतीने असा मी तसा मी, लागली पैज सत्या, सावित्री आणि सत्यवान, रामा माधव आणि तुझी माझी लव्हस्टोरी अशा अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. याशिवाय तिनं मराठीसह हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. ती नवऱ्यासोबत सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या