हॉलिवूडचं हॉट कपल म्हणून ओळख असलेल्या ब्रॅड पिट आणि जेनिफर अनिस्टनने २००५ मध्ये घटस्फोट घेतला होता. नुकताच पिट जेनिफरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसला. यामुळेच हे दोघं पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशा चर्चा सिनेवर्तुळात होत आहेत. आता दोघांमधलं नातं एका वेगळ्या पातळीचं आहे. ब्रॅडने जेनिफरला तिच्या ५० व्या वाढदिवसाला तब्बल ७९ मिलिअरचं गिफ्ट दिलं. भारतीय रुपयांमध्ये या गिफ्टची किंमत आहे तब्बल ५४९ कोटी रुपये. mirror.co.uk ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ब्रॅडने जेनिफरला ते लग्नानंतर ज्या घरी राहायचे ते घर गिफ्ट म्हणून दिलं. जेव्हा ‘हे’ स्टार कपल दुष्काळग्रस्त गावातील ढाब्यावर भेळ आणि उसाचा रस पिताना ब्रॅडला जेव्हा कळलं की जेनिफरला आवडलेलं आणि ते राहत असलेलं घर पुन्हा विकायला काढले आहे तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता ते मागतील त्या किंमतीत विकत घेतलं. हे घर बेवर्ली हिल्सच्या मार्केटवर स्थित आहे. शिवाय असं म्हटलं जातं की, दोघांनी वेगळं होण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा जेनिफरला हे तिचं स्वप्नातलं घर सोडावं लागल्याचं अतिव दुःख झालं होतं. शिवाय ब्रॅडकडून हे घर तेव्हाच विकत न घेतल्याची सल अनेक वर्ष तिच्या मनात होती. पाणी फाउंडेशनसाठी जेव्हा ‘हे’ मराठी स्टार्स वाहतात घाम
जेनिफरला जेव्हा हे कळलं की ब्रॅडने ते घर तिच्यासाठी पुन्हा घेतलं तेव्हा ती भावुक झाली होती. या घरात दोघांनी लग्नानंतरची तीन वर्ष एकत्र काढली होती. सध्या दोघं खूप चांगले मित्र आहेत आणि अनेक कार्यक्रमात दोघांना एकत्र पाहिलं जातं. घटस्फोटानंतरही त्यांच्यात मैत्रीचं नातं कायम होतं. पण ५५ वर्षीय ब्रॅड अँजेलिना जोलीसोबत असल्यामुळे त्याने याबद्दल कुठेही वाच्यता केली नाही. जेनिफरनेही गेल्यावर्षी मार्च महिन्यात पती जस्टिन थेरॉक्सला घटस्फोट दिला. अचानक जेनिफरच्या वाढदिवसाला ब्रॅडला पाहून अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’त नवीन ट्विस्ट, मालिकेत परत येऊ शकते दिशा वकानी दोन वर्षांपूर्वी ब्रॅड आणि अँजेलिनाचा घटस्फोट झाला. दोन वर्षांच्या लग्नानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. पण त्याआधी दोघंही तब्बल १२ वर्ष एकत्र राहत होते. अँजेलिना आणि ब्रॅडची पहिली ओळख २००४ मध्ये मिस्टर अँड मिसेस स्मिथ सिनेमाच्या चित्रीकरणावेळी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. ब्रॅड आणि अँजेलिनाला सहा मुलं आहेत. अँजेलिनासाठी ब्रॅडने जेनिफरला घटस्फोट दिला. सोशल मीडियावर आलिया भटच्या स्टायलिश बॅगची चर्चा, किंमत ऐकून व्हाल थक्क VIDEO : जेव्हा अमेरिकन झाले ‘आर्ची’ आणि ‘माऊली’, महाराष्ट्र दिनाच्या अशाही शुभेच्छा