JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सुपरस्टारचा मुलगा संन्यासी होण्याच्या मार्गावर, 28 व्या वर्षी गेला ओशोच्या आश्रमात

सुपरस्टारचा मुलगा संन्यासी होण्याच्या मार्गावर, 28 व्या वर्षी गेला ओशोच्या आश्रमात

एकेकाळी पुनम पांडेसोबत तो रिलेशनशिपमध्ये असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 नोव्हेंबर- दिवंगत बॉलिवूड अभिनेते विनोद खन्ना यांच्या अक्षय आणि राहुल या दोन मुलांना तर सारेच ओळखतात. पण त्यांच्या तिसरा मुलगा साक्षी खन्नाबद्दल फारसं कोणाला माहीत नाही. साधारण दोन वर्षांपूर्वी साक्षीने त्याचं प्रोडक्शन हाउस सुरू केलं होतं. पण आता त्याने वडिलांच्या पावलांवर चालण्याचा निर्णय घेतला आहे. स्पॉटबॉयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, साक्षी खन्नाही वडिलांप्रमाणे ओशोचा भक्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी साक्षी ओशाच्या आश्रमात गेला होता. 1990 मध्ये विनोद खन्ना यांनी दुसरं लग्न केलं. कविता आणि विनोद यांचा साक्षी खन्ना हा मुलगा आहे. त्यांना श्रद्धा ही मुलगीही आहे.

विनोद यांनी करिअरच्या शिखरावर असताना सिनेसृष्टीतून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. 70 च्या दशकातील शेवटच्या वर्षांमध्ये विनोद खन्ना हे ओशोच्या विचारांनी प्रभावित झाले आणि ते रजनीश आश्रमाचे संन्यासाी झाले. दरम्यान, 28 वर्षीय साक्षीला दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सिनेसृष्टीत ब्रेक देणार असल्याचं म्हटलं जात होतं. याशिवाय बाजीराव मस्तानी सिनेमात साक्षीने सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी पेलली होती. यानंतरच भन्साळी त्याला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण गेल्या काही वर्षांपासून तो कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसला नाही.

याशिवाय पुनम पांडेसोबतही त्याचं काही वर्ष अफेअर होतं. दोघं अनेकदा एकत्र फिरताना आणि पार्टी करताना दिसायचे. पण दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं नाही. 2011 मध्ये साक्षी खन्ना एका रेव पार्टीतही पकडला गेला होता. मात्र त्याने अमली पदार्थ सेवन केले नसल्याचं साक्षी म्हणाला होता. जेव्हा हा बॉलिवूड स्टार रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना फाइव्ह स्टारमध्ये घेऊन जातो शाहिद कपूरच्या पावलांवर पाऊल ठेवत ही अभिनेत्री करणार Arrange Marriage प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचं WhatsApp अकाउंट झालं हॅक, हॅकर करतोय अश्लील व्हिडीओ Promo Video: जेव्हा गरिबीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुलाचा मृत्यू होतो

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या